sonari_miting uran

सार्वजनिक मैदानावर न्हावा शेवा पोलिस ठाणे इमारतीचा घाट

सोनारी ग्रामस्थांचा उद्रेक; आंदोलनाचा इशारा जेएनपीटी | वार्ताहर | सोनारी गावातील ग्रामस्थ शाळेतील विद्यार्थी पुर्वापार वापरत असलेल्या सार्वजनिक मैदानावर जेएनपीटी प्रशासन न्हावाशेवा पोलीस ठाण्याची इमारत सोनारी ग्रामस्थांना विश्‍वासात न घेता बांधण्याचा घाट More »

panvel

सिडको अस्थापनेतील सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी करु नका

कर्मचार्‍यांची मागणी; आ.प्रशांत ठाकूर यांना निवेदन पनवेल | वार्ताहर | सिडको अस्थापनेतील वाशी शाखेमार्फत काम करीत असलेल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या ५७ सुरक्षा रक्षक कर्मचार्‍यांना कमी करण्यात येवू नये अशी मागणी कर्मचार्‍यांनी सिडकोचे More »

r.r. patil ncp

प्रपंच एकासोबतच असावा!

आर.आर.पाटील यांचा शेकापला सल्ला अलिबाग | प्रतिनिधी | प्रपंच एकासोबतच करावा, एकाच वेळी अनेकांसोबत संबंध ठेवणार्‍याला व्यभिचारी म्हणतात असा सल्ला राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी शेकापनेते आ.जयंत पाटील यांना दिला. राज्यात तीन More »

tatkare

राजकारणाचे बाळकडू….

श्रीवर्धन | माझ्या शाळेलापण आता सुट्टी आहे…माझ्याशी खेळायला कोणीच कसं राहत नाही…? आजी असते पण आजोबा कुठे? आई असते पण आत्या कुठे, बाबापण हल्ली खुप व्यस्त असतात…आता सांगा मी खेळणार कुठे? छोट्या More »

राष्ट्रवादीचा अहंकार रोखला पाहिजे

शिवसेनेच्या उपनेत्या डॉ.निलम गोर्‍हे यांचे आवाहन अलिबाग | प्रतिनिधी | अजित पवारांची ‘दादागिरी’ आणि तटकरेंची भाषाही तीच आहे. जणूकाही हे त्यांच्या घरचेच पाणी देत आहेत. राष्ट्रवादीचा हा अहंकार रोखलाच पाहिजे असे रोखठोक More »

sudhagad pali

बॉम्बे ९९ हिल स्टेशनविरोधात एल्गार

आ.विजय सावंतकडून रस्ता अडवणूक सुधागडातील पाच गावांचा मतदानावर बहिष्कार पाली | वार्ताहर | सुधागड तालुक्यातील ताडगाव, खेमवाडी, दुधनी, कोटबेवाडी येथील परिसर विकास संघर्ष समितीच्या माध्यमातून पाचगावच्या लोकांनी कॉंग्रेस आ.विजय सावंत यांच्या मनमानी More »

pali housebreak

पालीत घरफोडी, मोटारसायकलची चोरी

चोरट्यांपुढे पोलिस हतबल; नागरिकांमध्ये घबराट पाली | वार्ताहर | सुधागड तालुक्यातील चोर्‍या, घरफोड्यांचे सत्र कायम सुरुच असून शुक्रवारी मध्यरात्री पाली शहरात घरफोडी आणि मोटारसायकल चोरीची घटना घडली. सुधागड तालुक्यात घरफोड्याचे प्रमाण वाढले More »

accident on mumbai goa national highway

महाडजवळ दोन लक्झरी बसेसची समोरासमोर धडक

एक ठार; १० प्रवासी जखमी पोलादपुर | वार्ताहर | ‘ शनिवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर दोन खासगी लक्झरी गाड्यांची समोरा-समोर जोरदार ठोकर झाली. या भीषण अपघातात एका लक्झरी गाडीचा More »

mobile theft at nagothane

मोबाईल चोर नागोठणे पोलिसांच्या जाळ्यात

नागोठणे | वार्ताहर | चैत्र महिन्यात कोकणातील गावा गावात मोठया प्रमाणात उत्सव साजरे केले जात असतात. या यात्रांना महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. यात्रा मध्ये होणार्‍या गर्दीचा फायदा चोर घेत असून More »

anant gite shivsena

तटकरेंचा एक पाय तुरूंगात दुसरा लोकसभेत कशाला?

सवाद येथील प्रचार सभेत खा.अनंत गीतेंचा सवाल पोलादपूर | वार्ताहर | रायगड जिल्ह्याच्या विकासाबद्दल बोलण्याची पालकमंत्री तटकरेंना सवय जडली आहे. ते स्वत:च्या विकासासाठी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत काही बोलतील काय? त्यांचा एक पाय तुरुंगात More »

सार्वजनिक मैदानावर न्हावा शेवा पोलिस ठाणे इमारतीचा घाट

sonari_miting uran

सोनारी ग्रामस्थांचा उद्रेक; आंदोलनाचा इशारा

जेएनपीटी | वार्ताहर | सोनारी गावातील ग्रामस्थ शाळेतील विद्यार्थी पुर्वापार वापरत असलेल्या सार्वजनिक मैदानावर जेएनपीटी प्रशासन न्हावाशेवा पोलीस ठाण्याची इमारत सोनारी ग्रामस्थांना विश्‍वासात न घेता बांधण्याचा घाट घालीत असेल तर हा अन्याय सोनारी गावची जनता सहन करणार नाही. त्या विरोधात जन आंदोलन उभारु असा इशारा सोनारी गावेच सरपंच महेश कडू व ग्रामसुधारक मंडळाचे अध्यक्ष संदिप पाटील यांनी दिला आहे.

सिडको अस्थापनेतील सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी करु नका

panvel

कर्मचार्‍यांची मागणी; आ.प्रशांत ठाकूर यांना निवेदन

पनवेल | वार्ताहर | सिडको अस्थापनेतील वाशी शाखेमार्फत काम करीत असलेल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या ५७ सुरक्षा रक्षक कर्मचार्‍यांना कमी करण्यात येवू नये अशी मागणी कर्मचार्‍यांनी सिडकोचे व्यवस्थापकिय संचालक संजय भाटीया यांच्याकडे केली आहे. यामध्ये विशेष लक्ष घालून सुरक्षा रक्षक कर्मचार्‍यांचा हा प्रश्‍न सोडवावा अशी विनंती आ.प्रशांत ठाकूर यांच्याकडेही सुरक्षा रक्षक कर्मचार्‍यांनी केली आहे.

प्रपंच एकासोबतच असावा!

r.r. patil ncp

आर.आर.पाटील यांचा शेकापला सल्ला

अलिबाग | प्रतिनिधी | प्रपंच एकासोबतच करावा, एकाच वेळी अनेकांसोबत संबंध ठेवणार्‍याला व्यभिचारी म्हणतात असा सल्ला राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी शेकापनेते आ.जयंत पाटील यांना दिला. राज्यात तीन वेगवेगळ्या पक्षांसोबत युती करणारा शेकाप हा देशातील एकमेव राजकीय पक्ष असावा असा टोलाही त्यांनी लगावला.

राजकारणाचे बाळकडू….

tatkare

श्रीवर्धन | माझ्या शाळेलापण आता सुट्टी आहे…माझ्याशी खेळायला कोणीच कसं राहत नाही…? आजी असते पण आजोबा कुठे? आई असते पण आत्या कुठे, बाबापण हल्ली खुप व्यस्त असतात…आता सांगा मी खेळणार कुठे? छोट्या तटकरेंना पडलेल्या या प्रश्‍नांची उत्तरे शेवटी त्यांनीच शोधली..बाबांच्या बाईकवर जागा केली…आणि आजोबांच्या प्रचारासाठी रॅली केली…
….जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील तटकरे यावेळी पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विजयासाठी संपूर्ण तटकरे कुटूंब प्रचाराच्या रणधुमाळीत गुंतले आहे. शनिवारी श्रीवर्धन येथे आघाडीच्या रॅलीत अनिकेत तटकरे यांच्यासोबत त्यांचे पुत्रही सहभागी झाले आणि श्रीवर्धनकरांच्या कौतूकास पात्र ठरले…राजकारणाचे बाळकडू असावे लागते हेच खरे!

राष्ट्रवादीचा अहंकार रोखला पाहिजे

शिवसेनेच्या उपनेत्या डॉ.निलम गोर्‍हे यांचे आवाहन

अलिबाग | प्रतिनिधी | अजित पवारांची ‘दादागिरी’ आणि तटकरेंची भाषाही तीच आहे. जणूकाही हे त्यांच्या घरचेच पाणी देत आहेत. राष्ट्रवादीचा हा अहंकार रोखलाच पाहिजे असे रोखठोक प्रतिपादन शिवसेनेच्या उपनेत्या डॉ.निलम गोर्‍हे यांनी केले.

बॉम्बे ९९ हिल स्टेशनविरोधात एल्गार

sudhagad pali
  • आ.विजय सावंतकडून रस्ता अडवणूक
  • सुधागडातील पाच गावांचा मतदानावर बहिष्कार

पाली | वार्ताहर | सुधागड तालुक्यातील ताडगाव, खेमवाडी, दुधनी, कोटबेवाडी येथील परिसर विकास संघर्ष समितीच्या माध्यमातून पाचगावच्या लोकांनी कॉंग्रेस आ.विजय सावंत यांच्या मनमानी कारभाराविरोधात दंड थोपटले आहेत. सुधागडातील ताडगाव येथील बॉम्बे ९९ हिल स्टेशन प्रकल्प, तसेच एसइझेड प्रकल्पासाठी घेतलेली सुमारे ३ हजार एकर जमीन बेकायदेशीर असल्याचा आरोप टिकेडिके परिसर विकास संघर्ष समितीने केला असून लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही पीडित पाच गावच्या ग्रामस्थांनी घेतला आहे. तशी माहिती ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिली.

पालीत घरफोडी, मोटारसायकलची चोरी

pali housebreak

चोरट्यांपुढे पोलिस हतबल; नागरिकांमध्ये घबराट

पाली | वार्ताहर | सुधागड तालुक्यातील चोर्‍या, घरफोड्यांचे सत्र कायम सुरुच असून शुक्रवारी मध्यरात्री पाली शहरात घरफोडी आणि मोटारसायकल चोरीची घटना घडली. सुधागड तालुक्यात घरफोड्याचे प्रमाण वाढले असताना चोरटे हाती लागत नसल्याने पोलिस यंत्रणा हतबल झाल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे पालीकर जनतेत घबराट पसरली आहे.

महाडजवळ दोन लक्झरी बसेसची समोरासमोर धडक

accident on mumbai goa national highway

एक ठार; १० प्रवासी जखमी

पोलादपुर | वार्ताहर | ‘ शनिवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर दोन खासगी लक्झरी गाड्यांची समोरा-समोर जोरदार ठोकर झाली. या भीषण अपघातात एका लक्झरी गाडीचा चालक ठार झाला आहे. तर दुसर्‍या आराम गाडीचा चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. या दोन वाहनांमधील ठोकर एवढी जोरदार होती की, दोन्ही गाडयांच्या ड्रायव्हर केबिनचा चक्काचुर झाला.

मोबाईल चोर नागोठणे पोलिसांच्या जाळ्यात

mobile theft at nagothane

नागोठणे | वार्ताहर | चैत्र महिन्यात कोकणातील गावा गावात मोठया प्रमाणात उत्सव साजरे केले जात असतात. या यात्रांना महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. यात्रा मध्ये होणार्‍या गर्दीचा फायदा चोर घेत असून असाच प्रकार येथील हजरत मीरामोहिद्दीन शाहबाबा यांच्या उरुसात घडला आहे. या उरुसात गर्दीमध्ये बीड जिल्ह्यातील चार चोरांनी अकरा मोबाईल चोरले असल्याचे उघड झाले असून त्यांना नागोठणे पोलिसांनी मुद्देमाल तसेच कारसह ताब्यात घेतले आहे

तटकरेंचा एक पाय तुरूंगात दुसरा लोकसभेत कशाला?

anant gite shivsena

सवाद येथील प्रचार सभेत खा.अनंत गीतेंचा सवाल

पोलादपूर | वार्ताहर | रायगड जिल्ह्याच्या विकासाबद्दल बोलण्याची पालकमंत्री तटकरेंना सवय जडली आहे. ते स्वत:च्या विकासासाठी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत काही बोलतील काय? त्यांचा एक पाय तुरुंगात जाऊ पाहतोय तर मग दुसरा लोकसभेमध्ये कशाला पाठवायचा? मतदार बंधू भगिनींनो, शपथ घ्या. पैसा घेऊन मते देणार नाही. शिवसेनेलाच मतदान करणार. तटकरेंच्या भ्रष्टाचाराविरोधात आपले हात उंचावून मुठी वळून घ्या शपथ. पापाचा पैसा घेणार नाही, खा.अनंत गीते यांनी सवाद एस.टी.थांब्याजवळ युवासेनेने आयोजित केलेल्या प्रचारसभेत आवाहन करताच उपस्थितांनी मुठी वळून हात उंचावित त्यांना प्रतिसाद दिला.

श्रीवर्धनमध्ये आघाडीची मोटारसायकल रॅली

ncp rally at shrivardhan

श्रीवर्धन | वार्ताहर | रायगड लोकसभा मतदारसंघातुन कॉंगे्रस आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ रविवारी श्रीवर्धन शहरातून मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

पेण नगरपालिका कर्मचार्‍यांचा पक्षीय कामासाठी वापर

shivsena pen

निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे तक्रार

पेण | वार्ताहर | सत्ताधारी कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते लोकसभा निवडणुकीच्या पक्षीय प्रचारासाठी पेण नगरपालिका कर्मचार्‍यांचा वापर करत असल्याची तक्रार शिवसेना उपनेत्या डॉ. निलम गोर्‍हे यांनी आज निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांच्याकडे केली.

शेकापची जास्तीत जास्त मते शिवसेनेला पडतील

nilam gore shivsena

शिवसेना प्रवक्त्या आ.निलम गोर्‍हे यांना विश्‍वास

नागोठणे | वार्ताहर | शेकापने जो प्रकार केला तो अयोग्यच आहे. जयंत पाटील यांची भूमिका सुद्धा दुटप्पी आहे. शेकापच्या जयंत पाटील यांनी शिवसेनेच्या विरोधात काम करणार्‍याच्या भूमिकेला जिल्ह्यातीलच अनेक नेते मंडळींचा विरोध असून शेकापची जास्तीत जास्त मते शिवसेनेलाच पडतील असा विश्‍वास शिवसेनेच्या प्रवक्त्या आ.निलम गोर्‍हे यांनी व्यक्त केला.

वाकण-खोपोली महामार्ग धोकादायक

bike copy

 वेगाची नशा ठरतेय अपघाताचे कारण

सुधागड | वार्ताहर | वाकण-खोपोली महामार्ग अपघाताचा मार्ग ठरत आहे. या महामार्गावर सतत अपघात होत असून या महामार्गावरील वाहनांचा मर्यादेपेक्षा भयानक वेग येथे होणार्‍या अपघाताचे एक प्रमुख कारण आहे.
या मार्गावरील वेगवेगळ्या ठिकाणची बेकायदेशीर धोकादायक वळणे, महामार्गावरील गावांना सर्व्हिस रस्ता न बांधल्यामुळे त्या गावातील नागरिकांकडून लोखंडी जाळ्यांचे कुंपण तोडून जनावरे महामार्गावर येत असल्यानेही अनेक अपघात घडतात. मात्र याबाबत संबंधीत कोणतीही उपाययोजना करीत नसल्याचे दिसून येते.

पोलादपूरातील बिनपाण्याचे देवळे धरण

poladpur

पोलादपूर | वार्ताहर | तालुक्यातील बिनपाण्याचा देवळे लघुपाटबंधारे योजनेचा धरण प्रकल्प आतापर्यंत कोट्यवधी रूपये खर्च होऊनही प्रत्यक्षात कोरडा आहे. तालुका ‘सुजलाम-सुफलाम’ करण्याच्या प्रयत्नांमध्ये अनास्था निर्माण करण्यास हा देवळे लघुपाटबंधारे प्रकल्प कारणीभूत ठरत आहे.