पेणमध्ये कोरोनाचे 11 नवीन रुग्ण आढळले; वाढता प्रादुर्भाव चिंताजनक

0
564

पेणमध्ये कोरोना रुग्णांची संख्या शंभरी पार

पेण : पेण तालुक्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. आज (28 जून) तालुक्यात पुन्हा 11 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या शंभरी पार गेली आहे.
आज आढळून आलेल्या नवीन 11 रुग्णांमध्ये रामवाडी येथील 1, नारदास चाळ येथील 1, देवनगरी येथील 1, इस्त्राईल आळी येथील 3, चिंचपाडा येथील 2 आणि शितलविहार येथील 3 रुग्णांचा समावेश आहे. रामवाडी येथे एका 25 वर्षीय तरुणाला कोरोना झाला आहे. देवनगर येथील 52 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तर नरदास चाळ येथील 48 वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे.
इस्त्राईल आळी येथील 37 वर्षीय, 32 वर्षीय आणि 66 वर्षीय अशा तीन व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर चिंचपाडा येथेही दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शितलविहार येथील 12 वर्षीय मुलगी, 38 वर्षीय महिला आणि एका पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. तर बेणसे 4, पाटणोली 1, बोरी 1, सागर सोसायटी 1, एफएमसी मार्केट 1 असे 8 रुग्ण आज कोरोना मुक्त झाले आहेत.
दरम्यान, या नवीन 11 रुग्णांमुळे तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 101 झाली आहे. यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, 58 रुग्ण उपचारानंतर बरे झालेत. सद्यस्थितीत 42 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. By Raigad Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here