कर्जतमध्ये आणखी कोरोनाचे 15 रुग्ण; रुग्णांची संख्या सव्वाशेवर

0
122
उत्तरकार्य मध्ये सहभागी आणखी 6 कोरोना ग्रस्त
कर्जत : कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून आणखी 15 रुग्णांची वाढ झाली आहे.तर किरवली बोरवाडी मधील उत्तरकार्य मध्ये सहभागी झालेल्या आणखी 6 जणांना कोरोना ने ग्रासले आहे.दरम्यान,कर्जत तालुक्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने सव्वाशेचा पल्ला गाठला असून त्यात कर्जत शहरातील 6 रुग्णांचा समावेश आहे.

कर्जत तालुक्यात 27 जून रोजी तब्बल 20 रुग्ण आढळून आले होते आणि त्यात सर्वाधिक 14 रुग्ण हे किरवली येथील बोरवाडी येथे उत्तरकार्य मध्ये सहभागी यांचा समावेश होता.त्यात तेथे उपस्थित असलेल्या आणखी 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे उत्तरकार्य मधील उपस्थिती सध्या तरी 22 जणांना भोवली आहे,त्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 25 जून रोजी आढळून आला होता.आज 28 जून रोजी बोरवाडी मधील एका वर्षाच्या बालकांसह 31 वर्षीय महिला कोरोनाग्रस्त झाल्या आहेत.त्याचवेळी उत्तरकार्य मध्ये सहभागी डिकसळ गावातील 56 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्टचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्याच कार्यक्रमात सहभागी झालेले कर्जत शहरातील नगरपालिका कार्यालयासमोर असलेल्या अमिरा बिल्डिंग मधील 56 वर्षीय पुरुष आणि 48 वर्षीय महिला हे दोघे देखील कोरोनाग्रस्त झाले आहेत.त्याचवेळी कर्जत शहरातील भिसेगाव मधील उत्तरकार्य मध्ये सहभागी 60 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्ट चे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.कर्जत शहरातील कचेरी रोड येथील आनंद नगर येथील 49 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह झाल्या असून तेथील शिवम अपार्टमेंट मध्ये राहणारा 36 वर्षीय तरुण देखील कोरोना पॉझिटिव्ह बनला आहे.
ग्रामीण भागात हेदवली गावात तब्बल तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.त्यात पती-पत्नी असलेल्या 48 वर्षीय महिला आणि 56 वर्षीय पुरुष आणि त्यांची 25 वर्षीय मुलगी यांचा समावेश आहे.तालुक्यातील वंजारपाडा गावातील एका 36 वर्षीय तरुणाला कोरोना ने ग्रासले असून वंजारपाडा गावातील चार दिवसातील हा दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे.नेरळ गावातील सम्राटनगर मध्ये राहणारे 52 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे.हा व्यक्ती नेरळ बाजारपेठ मध्ये कांदा-बटाटा यांची विक्री करणारा व्यवसाय करतो.त्यामुळे त्यांच्या संपर्कात किती लोक आले आहेत,त्याबद्दल आरोग्य विभाग साशंक आहे.आजच्या 15 रुग्णांमुळे कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 127वर पोहचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here