उरणमध्ये कोरोनाचे १५ नवीन रुग्ण ; आणखी एकाचा मृत्यू

0
84
एकूण बाधित रुग्णांची संख्या २५१ वर *
घन:श्याम कडू/उरण : उरणमध्ये दिवसेंदिवस कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा पुन्हा वाढत चालला आहे. शनिवारी (२७ जून) १५ नवीन रुग्ण आढळून आले असून एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे.
उरणमधील गोवठणे गावच्या ४५ वर्षीय कोरोनाग्रस्त तरुणाचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला आहे. यामुळे उरणमध्ये कोरोनाने मृत्यू होण्याचा आकडा ३ वर गेला आहे. उरणमध्ये शनिवारी नवीन शेवा येथील ७ वर्षीय मुलगा, तर १३ वर्षीय मुलगी, ३७ वर्षीय व ६२ वर्षीय महिला, जासई येथील ६ वर्षीय मुलगा, २९ वर्षीय व ५० वर्षीय पुरुष, चिर्ले येथील ३८ वर्षीय व ३३ वर्षीय महिला, सेक्टर-१५ द्रोणागिरी नोड येथील ५६ वर्षीय पुरुष, सिडको कॉलनी येथील ५४ वर्षीय पुरुष, बालई येथील ४७ वर्षीय पुरुष, पाणदिवे येथील ४२ वर्षीय पुरुष, दिघोडे येथील ४९ वर्षीय पुरुष, विंधणे येथील ३४ वर्षीय पुरुष असे एकूण १५ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत.
तर देऊळवाडी येथील २, बोरी १, कोटनाका १,गोवठणे २, पाणजे १, जासई १, तांडेलनगर १ असे एकूण ९ जण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना शनिवारी घरी सोडण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. २७ जून अखेर एकूण बाधित रुग्णांची संख्या २५१ वर गेली आहे. त्यामध्ये १९६ रुग्ण बरे झाले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहेत. सद्यस्थितीत ५२ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here