मुंबई-गोवा महामार्गावर आणखी एक बळी…

0
22

दुचाकीस्वाराचा मृत्यू; संतप्त जनतेचा रास्ता रोको

वडखळजवळ झाला अपघात

पेण । वार्ताहर । मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच असून दोन दिवसांपूर्वी तारा गावाजवळ झालेल्या अपघातानंतर पुन्हा एकदा पेण तालुक्यातील वडखळजवळ झालेल्या मोटारसायकल अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर संतप्त झालेल्या जनता व प्रवाशांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत आपल्या संतापाला वाट करुन दिली.

मुंबई-गोवा महामार्गाची पुरती दूरवस्था झाली असून जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य, धूळ यामुळे या महामार्गावरुन प्रवास करणे म्हणजे एक दिव्य बनले आहे. पडलेल्या खड्ड्यांमुळेच रोज कुठे ना कुठे अपघात होत असून त्यात निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. रविवारी (दि.10) सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास महामार्गावरुन ब्रिजेश शिवचंद्र यादव (रा. ठाणे) हे मोटारसायकल (क्रमांक एम. एच. 04 – जी. एच. 3735) घेऊन पेणकडून वडखळ बाजूकडे जात होते. वडखळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रनगर महामार्गावर पडलेल्या खड्डे व टाकलेल्या खडीवरुन मोटारसायकल घसरल्याने ब्रिजेश यादव हे खाली रस्त्यात पडले. त्याचवेळी पाठीमागून येणारा ट्रेलर त्यांच्या अंगावरुन गेल्याने त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या अपघातप्रकरणी ठेकेदाराला हजर करा, त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसे- नेचे उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड,nविभागप्रमुख हिराजी चोगले, तसेच संतप्त ग्रामस्थ व प्रवाशांनी केली. यावेळी वडखळचे पोलिस निरिक्षक मेंगळे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी याप्रकरणी दोषींवर कारवाई केली जाईल, असे सांगत आंदोलनकर्त्यांची समजूत काढली. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here