स्वच्छता मोहीम अभियानापुरती नको

0
43
????????????????????????????????????

स्वच्छतेची सवय बाळगा; जिल्हाधिकार्‍यांचे नागरिकांना आवाहन

अलिबाग | वार्ताहर | निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची असून स्वच्छता मोहिम केवळ अभियानपुरती मर्यादित न ठेवता नियमित असावी. यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेची सवय बाळगून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी शनिवारी (दि.१६) येथे केले.
निर्मल सागर तट स्वच्छता मोहीम अंतर्गत, कोस्ट गार्ड, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, मेरीटाईम बोर्डाचे प्रधान अधिकारी जसविर सिंग, कंमाडट कोस्ट गार्ड अरुण कुमार सिंग आदि मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, स्वच्छ भारत अभियानाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे. त्यानुसार आपण सातत्याने स्वच्छता मोहिम विविध ठिकाणी राबवितो. या मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारे स्वच्छ करण्याचे काम आजपासून सुरु करण्यात आले आहे. आपला समुद्र किनारा नियमित स्वच्छ ठेवला तर येथे येणार्‍या पर्यटकालाही आनंद मिळेल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनाही या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
या मोहिमेत जे.एस.एम. महाविद्यालयाचे विद्यार्थी, केळुस्कर विद्यालयाचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक संघटना, एन.सी.सी.चे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here