एसटीत चोरी करणार्‍या महिलेसह ३ बालकांना पकडले

0
67

अलिबाग | प्रतिनिधी | गर्दीचा फायदा घेऊन पेण एसटी स्टँडमध्ये चोरी करणार्‍या एका महिलेसह तीन बालकांना पेण पोलिसांनी पकडले.
गुरुवारी (दि.२१) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एक महिला प्रवासी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवून चोराने त्यांच्या गळ्यातील हँड बॅग व त्यामधील रोख रक्कम, आधारकार्ड असा अडीच हजार रुपये किंमतीच्या वस्तू चोरून नेल्या. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पेण पोलिसांत तक्रार दाखल केली. सायंकाळी ही चोरी करणार्‍या २४ वर्षीय महिलेसह तीन बालकांना ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here