जात पडताळणीसाठी उमेदवारांची धावपळ

0
65

जिल्हाधिकार्‍यांच्या शिफारस पत्रासाठी झुंबड

अलिबाग | वार्ताहर | रायगड जिल्ह्यात १६ ऑक्टोबर रोजी २४२ ग्रामपंचायतीचे मतदान प्रक्रिया होत असून यावेळी सरपंच पदाची निवडणूक थेट मतदारांमधून होणार आहे. सरपंच व सदस्य पदासाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याची अंतिम तारीख २९ सप्टेंबर आहे. त्याचबरोबर निवडणुकीसाठी उभे राहणार्‍या उमेदवाराला जात पडताळणी समितीकडे जात पडताळणी प्रमाणपत्र अर्ज सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे शिफारस पत्र लागत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या उमेदवारांची गर्दी पहायला मिळत आहे.
रायगड जिल्ह्यात येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सरपंच व सदस्य पदासाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी राजकिय पक्षाच्या उमेदवाराची लगबग सुरु झाली आहे. तसेच जनरल वर्ग सोडता इतर वर्गातील उमेदवारांना निवडणुकीसाठी उभे राहण्यासाठी जातीचा दाखला व जात पडताळणी प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे.
जात पडताळणी कार्यालयात जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी निवडणूक लढणार्‍या उमेदवाराना जिल्हाधिकारी रायगड याच्या शिफारशीचे पत्र घेणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयात येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला गर्दीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आता जिल्ह्यात असल्यामुळे इतर वर्गातील उमेदवाराचा वेळ व पैसा वाचत आहे. मात्र आदिवासी वर्गातील उमेदवाराला ठाणे येथे जाऊन आपला अर्ज सादर करावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here