जेएस्डब्ल्यूमार्फत नागरिकांना क्लोरी वॅॅटचे वाटप

0
22

| रायगड टाइम्स |
पेण | जेएस्डब्ल्यू स्टील लि., डोलवी प्र्रकल्पातर्फे राबविण्यात येणार्‍या सामाजिक उपक्र्रमांतर्गत प्र्रकल्पाच्या सभोवताली असलेल्या ग्र्रामपंचायतींमध्ये पाणी शुध्दीकरणासाठी क्लोरी वॅॅटचे वाटप करण्यात आले.
अशुध्द पाणी व त्या पाण्यापासून उद्भवणारे आजार सर्वांनाच ज्ञात आहेत. जेएस्डब्ल्यू प्रकल्पाजवळ असलेल्या क्षेत्रात पावसाचे प्र्रमाण जरी जास्त असले तरी उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे प्र्रमाणही बरेच आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्याच्या वापरामुळे ग्र्रामस्थांना पूर्ण शुध्द पाणी मिळण्याची शाश्‍वती नसते. अशा अशुध्द पाण्याच्या वापरामुळे अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. पाण्यामध्ये योग्य प्र्रमाणात क्लोरीवॅॅटचा वापर केल्याने पाणी शुध्द व निर्जंतुक राहते. परिणामी, डायरीया, कावीळ, गॅॅस्ट्र्रो, टाइफॉॅईड अशा संसर्गजन्य रोगांपासून नागरिकांचा बचाव होण्यास मदत होईल. या उपक्र्रमाचा फायदा १० ग्र्रामपंचायतीतील नागरिकांना होणार आहे.
यासर्व बाबींचा विचार करुन जेएस्डब्ल्यू कंपनी व्यवस्थापनाने प्र्रकल्पाच्या परिसरात शुध्द व निर्जंतुक पाण्यासाठी क्लोरि वॅॅट वॉॅटर प्युरीफायरचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. शहाबाज येथे कंपनी व्यवस्थापनाचे सीएस्आर विभाग प्र्रमुख राजेश नैनिकवाल यांच्या हस्ते क्लोरिवॅॅटच्या वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शहाबाजचे सरपंच सतीश तरे, उपसरपंच संगीता म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य रेखा जुईकर, सुलभा पाटील, मनिषा पाटील आदी उपस्थित होते.
या उपक्र्रमांतर्गत प्र्रकल्पाच्या परिसरातील ग्र्रामपंचायतींमध्ये क्लोरिवॅॅॅॅट वॉॅटर प्युरीफायर च्या १०० मि. लि.च्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. ग्र्रामपंचायतींच्या लोकसंख्या व गरजेनुसार ग्र्रामपंचायत वडखळ येथे २०००, ग्र्रामपंचायत डोलवीला ६००, ग्र्रामपंचायत गडब येथे २१००, ग्र्रामपंचायत शहाबाज येथे १५०० अशा एकूण १२००० क्लोरिवॅॅटच्या बाटल्या ग्र्रामपंचायतींना सुपुर्द करण्यात आल्या आहेत. सदर उपक्र्रमासाठी जेएस्डब्ल्यु व्यवस्थापनाकडुन सुमारे २ लाख ८३ हजाराचा निधी खर्च करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here