खालचा ओवळा गावाचे हीपुनर्वसन करा!

0
51

रामशेठ ठाकूर यांचा सिडकोकडे आग्रह

| रायगड टाइम्स |
पनवेल | खालचा ओवळा गावाचा दहागाव समितीत समावेश करून त्याचे पुनर्वसन करावे, तसेच या गावाच्या जागेवर सिडकोने भराव करून नव्याने घरे बांधण्यास मदत करावी, अशी मागणी माजी खासदार रामशेठ ठाकूर व खालचा ओवळा गावाच्या ग्रामस्थांनी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता लवंगारे यांच्याकडे सिडको भवनमधील बैठकीत केली.
खालचा ओवळा गावाला पूरग्रस्त म्हणून मान्यता देऊन त्याची उंची वाढवावी व त्यासाठी भरावही सिडकोने करावा, तसेच कमी उंचवरील सखल भागातील घरांचेही पुनर्वसन करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भात खालचा ओवळा, वरचा ओवळा, उलवा, तरघर, कोंबडभुजे आणि गणेशपुरी या गावांच्या पुनर्वसनाबाबत सिडको भवनातील कार्यालयात झालेल्या बैठकीत सहव्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता लवंगारे, मुख्य अभियंता राजन दाहीरकर, सिडकोचे सर्व वरिष्ठ अभियंता, कार्यकारी अभियंता, ग्रामस्थांचे नेते आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
ओवळा गावाची नदी वळवण्यासाठी सिडकोने सादर केलेल्या प्रेझेंटेशनमुळे ग्रामस्थांचे समाधान न झाल्याने पुन्हा पुणे येथून कागदपत्रे आणून ग्रामस्थांना त्या जागी जाऊन त्यांच्या शंकांचे निरसन करावे आणि त्यांचे पूर्ण समाधान करण्यात यावे असे ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here