नेरळ ग्रामपंचायतीकडून शिवजयंती साजरी

0
96

। रायगड टाइम्स ।
कर्जत । छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी (दि.19) नेरळ ग्रामपंचायतीच्यावतीने साजरी करण्यात आली. ग्रामपंचायतच्यावतीने नेरळ गावातील शिवाजी महाराज चौकाला फुलांची आरास करण्यात आली होती. चौकातील सिंहासनावर बसलेल्या शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सरपंच सुवर्णा नाईक यांनी पुष्पहार घातला. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य नितेश शाह, प्रथमेश मोरे, शिवसेनेचे उपशहरप्रमुख बंडू क्षीरसागर, आदिवासी संघटनेचे कर्जत तालुका सचिव सुनील पारधी, नेरळ सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष सुधाकर नाईक, आदीसह नेरळकर उपस्थित होते. त्यानंतर नेरळ ग्रामपंचायतचे सदस्य आणि पदाधिकारी हे शिवसेना नेरळ शहर शाखेत गेले. तेथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन आणि पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात शिवजयंतीनिमित्त राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायतच्या अंगणवाडी केंद्रातील विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here