वाडगाव ग्रामपंचायतीचा भूमीपूजन सोहळा

0
109

जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती

। रायगड टाइम्स ।
अलिबाग । अलिबाग तालुक्यातील वाडगाव ग्रामपंचायत कार्यालयाचे विस्तारीकरण करणे या कामाचे भूमीपूजन शुक्रवारी (दि.16) करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नारळ वाढवून या कामाला सुरुवात करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीच्या जनसुविधा कार्यक्रमांतर्गत ही योजना राबविण्यात आली असल्याची माहिती सरपंच जयेंद्र भगत यांनी दिली.
वाडगाव ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरणासाठी वाडगावचे सरपंच जयेंद्र भगत यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांच्याकडे मागणी केली. जिल्हा नियोजन समितीच्या जनसुविधा कार्यक्रमांतर्गत आ.सुनील तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या माध्यमातून तसेच वाडगावचे सरपंच जयेंद्र भगत यांच्या प्रयत्नातून कार्यालयाच्या विस्तारीकरणासाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
या योजनेमार्फत कार्यालयामध्ये सभागृह बांधण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या हस्ते विधीवत पूजा करून करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्या प्रियदर्शनी पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा मुख्य संघटक ऋषीकांत भगत, जिल्हा उपाध्यक्ष संतोष निगडे, जिल्हा चिटणीस जगदीश घरत, अलिबाग पंचायत समिती सदस्या मीनल माळी, चेंढरेचे सदस्य अजित माळी, दत्ता ढवळे, वाडगावचे सरपंच जयेंद्र भगत, उपसरपंच नरेश थळे, माजी उपसरपंच काशीनाथ भगत सर्व सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here