शिवघोषाने दुमदुमले माथेरान!

0
53

। रायगड टाइम्स ।
माथेरान । छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस माथेरानमध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदाने छत्रपतींच्या नामाचा जयघोष करीत आनंदाने साजरा करण्यात आला. सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील छत्रपतींच्या अर्धपुतळ्याला विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नौरोजी उद्यानातील हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्ध पुतळ्याला नगरसेवक राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार तर स्वातंत्र्य सैनिकांच्या स्तंभास नगरसेवीका वर्षा रोड्रीक्स आणि ऋतूजा प्रधान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगरपालिका गटनेते प्रसाद सावंत, विद्यमान नगरसेवक शिवाजी शिंदे, माजी बांधकाम सभापती शकिल पटेल, माजी शिक्षण सभापति नरेश काळे, संदीप कदम, नगरपालिका वरिष्ठ लिपीक रत्नदीप प्रधान, आदि मोठ्या संख्येने शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here