गच्चीवर ओल्या कचर्‍यापासून गांडूळ निर्मिती

0
53
eka gruhinine kela olya kachryapasun gandul khat nirmiti chi pahani ayuktani keli

अनिलकुमार कुलकर्णी कुटुंबाचा अभिनव उपक्रम

2 वर्षांत 350 किलो खतनिर्मिती

। रायगड टाइम्स ।
पनवेल । घरातील ओला कचरा घरात जिरवून त्याच्यापासून गांडूळ खताची निर्मिती करण्याचा अनोखा अभिनव उपक्रम पनवेल शहरात राहणार्‍या अर्चना अनिलकुमार कुलकर्णी आणि अनिलकुमार कुलकर्णी यांनी सुरू केला आहे. इमारतीच्या उघड्या गच्चीवर मिळेल त्या पद्धतीने आणि जागेत घरातील ओला कचर्‍यापासून गांडूळ खताची निर्मिती कुलकर्णी कुटुंबाने केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून या खताची निर्मिती केली जात आहे. जवळपास 350 किलो खतनिर्मिती कुलकर्णी कुटुंबांनी केली आहे. ही खंत निर्मिती कुलकर्णी कुटूंब राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवर एका कुंडीत करत आहे. आज या अभिनव उपक्रमाला पनवेल महानगरपालिकाचे आयुक्त सुधाकर शिंदे यांनी भेट देउन त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
स्वच्छ पनवेल आणि सुंदर पनवेल करण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने राबवण्यात येणार्‍या अभिनव उपक्रम पनवेलमधील रहिवाशांना आता मोलाचा सहभाग घेतला आहे. कचरा घरात जिरवणे, कचरा कचराकुंडीत फेकणे, प्लॅस्टीक पिशव्याचा वापर टाळणे यासारख्या उपक्रमाला पनवेलकरांनी योगदान दिले आहे. यामध्ये पनवेल शहरातील अशोका गार्डन शेजारी वसंत व्हीला अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या कुलकर्णी कुटुंबानी स्वयंपाक घरातून निघणार ओला कचरा इमारतीच्या उगड्या गच्चीवर प्रक्रिया करून त्या पासून गांडूळ खताची निर्मिती करत आहे. या साठी कुलकर्णीं कुटुंबाला त्यांच्या इमारतीमधील इतर रहिवाशियाना चांगले सहकार्य केल्याचा आनंद अर्चना कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.
नुकतीच, पनवेल म्हणगरपालिकाचे आयुक्त सुधाकर शिंदे यांनी या खत प्रकल्पाला भेट दिली आणि या उपक्रमाचे स्वागत केले. या खत निर्मितीसाठी इमारतीची तातडीची बैठक बोलावून या परिसरातील ओला कचरा या ठिकाणी जिरवण्याचे आव्हान ते रहिवाशांना करणार असल्याचे आयुक्त सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here