रिलायन्सच्या मैदानावर महाराष्ट्र महिला संघाचे प्रशिक्षण शिबीर

0
58

। रायगड टाइम्स ।
अलिबाग । महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 23 वर्षांखालील महिला संघाचे प्रशिक्षण शिबीर 11 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी ह्या कालावधीत रिलायन्स नागोठणेच्या सुसज्य मैदानावर घेण्यात आले.
पुढील आठवड्यात राजकोट येथे होणार्‍या पश्चिम विभागाच्या क्रिकेट स्पर्धेसाठीच्या पूर्व तयारीसाठी हे प्रशिक्षण घेण्यात आले होते. 10 दिवस चाललेल्या या प्रशिक्षण शिबिराचे प्रशिक्षण महाराष्ट्र महिला क्रिकेटचे प्रशिक्षक शंकर दळवी यांनी केले. मध्यप्रदेश संघाला आमंत्रित करून त्या संघा बरोबर तीन एक दिवसीय सराव सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या तीन सराव सामन्यात दोन सामने मध्येप्रदेशच्या संघाने तर एक सामना महाराष्ट्राच्या संघाने जिंकला. दोन्ही संघाच्या खेळाडू व प्रशिक्षकांनी रिलायन्सच्या मैदानचे व संपुर्ण आयोजनाचे कौतुक केले. खेळाडूना प्रोत्साहन व मगर्दर्शन करण्यासाठी रिलायन्स नागोठणे विभागाचे अध्यक्ष अविनाश श्रीखंडे, उपाध्यक्ष चेतन वाळंज, महाराष्ट्र क्रिकेट असो.चे सेक्रेटरी रियाज बागवान, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा क्रिकेट असो.चे अध्यक्ष चंद्रकांत मते उपकार्यध्यक्ष जयंत नाईक, उपस्थित होते.
शिबिराचे संपूर्ण व्यवस्थापन हे रिलायन्स नागोठणे विभाग व रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here