सुतारवाडी धगडवाडीत चायनीज कोबी

0
277

सुतारवाडी धगडवाडी आणि सावरवाडी परिसरात धरणाच्या पाण्यावर उन्हाळी भाजी पाल्याची पिक घेण्यासाठी स्थानिकांसह पेण, पनवेल येथील शेतकरी चांगले उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत.
दहा वर्षांपूर्वी सावरवाडी येथील एका शेतकर्‍याने सावरवाडी येथे अमेरिकन मका आणि ज्वारीची लागवड केली. तसेच एका शेतकर्‍याने तूर, काकडी, भोपळा आदींची लागवड केली होती. त्यावेळी त्यांना भरघोस उत्पादन येऊन नफाही चांगल्या प्रकारे झाला होता. सुतारवाडीपासून अर्धा किमी अंतरावर सावरवाडी धरण आहे. या धरणाला बारमाही पाणी असते. या धरणाचे पाणी काही गावांना पिण्यासाठी पुरविण्यात आले आहे. तर उन्हाळी भाजी पाला लागवडीसाठी धरणाच्या पाण्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. काकडी, कलिंगड, शिराळी, या भाजी पाल्यांचि लागवड मोठ्या प्रामाणावर केली जाते. यावर्षी एका शेतकर्‍याने अगदी कमी जागेत. चायनिज कोबी लावण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या या प्रयत्नाला चांगले यशही आले. त्याने सुरुवातीला प्रयत्न म्हणून दहा चायनीज कोबीची रोपे लावली. थोड्याच दिवसांत सुंदर अशी कोबी दिसू लागली. या शेतकर्‍याने सांगितले की, हे पिक तीन महिन्यांत काढणीला येते. पहिलाच प्रयोग असल्यामुळे फक्त दहा रोपे लावली. जोपासना योग्यप्रकारे केल्यानंतर मेहनतीचे फळ आपोआप मिळत असल्याचेही त्याने सांगितले.

यशोगाथा

हरिश्चंद्र महाडीक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here