अलिबाग तालुक्यात कोरोनाचे 21 नवे रुग्ण

0
5966
  • दिवसभरात 19 रुग्ण झाले कोरोना मुक्त

  • बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 64 वर

अलिबाग : अलिबाग तालुक्यात आज कोरोनाच्या 21 रुग्णांची नोंद झाली असून, दिवसभरात 19 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आजअखेर तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 64 वर पोहोचली आहे. यापैकी 857 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर 177 रुग्णांवर सद्यस्थितीत उपचार सुरु आहेत.

तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज 21 जणांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. यामध्ये चेंढरे पाटील वाडी येथील 33 वर्षीय तरुण, शहाबाज पांडवादेवी येथील 27 वर्षीय व 28 वर्षीय तरुणींना, वाघोली येथील 43 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाला आहे. काचळी येथेही दोन रुग्णांची नोंद झाली असून, येथील 50 वर्षीय पुरुष व 26 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.

गोंधळपाडा इंद्रप्रस्थ येथे आज पुन्हा दोन रुग्ण आढळून आले आहेत. येथील 32 वर्षीय तरुणाला व 19 वर्षीय तरुणीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. वाडगांव येथील 25 वर्षीय तरुणाला, अलिबाग शहरातील मारुती नाका येथील 24 वर्षीय तरुणाला, नवगांव येथील 50 वर्षीय व्यक्तीला, वेश्‍वी येथील 51 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. आक्षी येथील दोघांना कोरोना झाला असून, यामध्ये 46 वर्षीय पुरुष व 36 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

नारंगी येथील 35 वर्षीय तरुणाला व 28 वर्षीय तरुणीला, अलिबाग कोळीवाडा येथील 23 वर्षीय तरुणीला, मुनवली येथील 42 वर्षीय व्यक्तीला, वरसोलीतील बे ब्ल्यू को.ऑपरेटीव्ह सोसायटीत राहणार्‍या 37 वर्षीय व्यक्तीला, रेवदंडा बाजारपेठेतील 48 वर्षीय व्यक्तीला तर चेंढरे वैभव नगर येथील 65 वर्षीय वृद्धेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

आज याआधी कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या 19 जणांनी कोरोनाला हरवले आहे. हे सर्वजण पूर्णपणे ठणठणीत बरे झाले असून, कोरोनातून त्यांची यशस्वी सुटका झाली आहे. यामध्ये सहाणगोठी येथील 1, आरसीएफ कॉलनी कुरुळ 3, चेंढरे 1, चोंढी 1, कार्ले 1, अलिबाग शहरातील ओम दत्त कृपा सोसायटीतील 1, मानी-भुते 1, कृष्ण सागर सोसायटी बायपास रोड चेंढरे येथील 1, चिंचवली 1, वेश्‍वी 1, कार्लेखिंड 1, वरसोली कोळीवाडा 1, बोडणी 1, अलिबाग डोंगरे हॉलजवळील 1, सारळ 1, बोरपाडा 1 आणि वाघ्रण येथील एकाचा समावेश आहे.

दरम्यान, आजअखेर अलिबाग तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 64 वर पोहोचली आहे. यापैकी 30 रुग्ण दगावले असून, 857 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 177 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार शेजाळ यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here