रायगडात कोरोनाचा कहर! जिल्ह्यात २६३ नवीन रुग्ण आढळले

0
5325
बाधित रुग्णांची संख्या ३ हजार ९४६ वर
अलिबाग : रायगडात कोरोनाचा कहर सुरूच असून, बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. जिल्ह्यात आज (३० जून) कोरोनाचे २६३ नवीन रुग्ण आढळले असून बाधित रुग्णांची संख्या ३ हजार ९४६ वर पोहोचली आहे. यापैकी १३४ रुग्णांचा या महामारीने बळी घेतला आहे.
आज नोंद झालेल्या २६३ रुग्णांमध्ये पनवेल महापालिका क्षेत्रातील १२७, पनवेल ग्रामीणमधील ५४, उरणमधील १२, खालापूर २१, कर्जत ३, अलिबाग २३, मुरुडमधील १, रोह्यातील १६ आणि महाड तालुक्यातील ६ रुग्णांचा समावेश आहे. तर पनवेल मनपा हद्दीतील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला.
दिलासा देणारी बाब म्हणजे आज १४२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यात पनवेल मनपा हद्दीतील ८४, पनवेल ग्रामीण ७, उरण ६, कर्जतमधील १३, पेणमधील २, अलिबागच्या १७, रोह्यातील ११ आणि पोलादपूर तालुक्यातील २ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ३ हजार ९४६ बाधित रुग्णांपैकी २ हजार ३३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ते आपल्या घरी परतले आहेत.
सद्यस्थितीत जिल्ह्यात पनवेल मनपा हद्दीतील ७३२, पनवेल ग्रामीण ३३८, उरण ५९, खालापूर ६३, कर्जतमधील ५८, पेण ४८, अलिबाग ५६, मुरुड ९, माणगाव २८, तळा २, रोहा ५३, सुधागड १, श्रीवर्धन ११, महाड १४, पोलादपूर तालुक्यातील ३ अशा एकूण १ हजार ४७५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here