कोरोनाचा कहर! पनवेल ग्रामीणमध्ये आज 50 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले

0
349

पनवेल : पनवेल ग्रामीणमध्ये आज (29 जून) कोरोनाचे 50 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 7 रुग्णांनी उपचारानंतर कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

आज नोंद झालेल्या नवीन 50 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये करंजाडे येथील 5, उलवे येथील 7, दिघाटी येथील 5, तुराडे येथील 1, बामणडोंगरी येथील 2, आदई येथील 1, सुकापूर येथील 5, नेरे येथील 4, साई येथील 1, विचुंबे येथील 3, कोळवाडी येथील 2, पेठ गाव येथील 1, कोलवाडी येथील 1, विहिघर येथील 1, शिरढोण येथील 1, देवत येथील 1, बारापाडा येथील 6, उसर्ली खुर्द येथील 2, तरघर येथील 1 रुग्णाचा समावेश आहे.

तर दिवसभरात 7 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. यामध्ये कानपोली 1, डेरीवली 1, उसर्ली येथील 1, उलवे येथील 1, अरिवली येथील 1, आकुर्ली येथील 2 रुग्णांचा समावेश असून, या सातही जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here