अ‍ॅडमिशनसाठी गेल्या त्या परत आल्याच नाहीत

2811 Viewed Raigad Times Team 0 respond

सख्ख्या बहिणींसह तीन मुली गायब,उरण म्हातवली येथील खळबळजनक घटना

उरण । वार्ताहर । चौदावीच्या अ‍ॅडमिशनसाठी घराबाहेर पडलेल्या 21 वर्षीय युवतीसह तिच्या शेजारी राहणार्‍या दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची घटना सोमवारी (दि.27) उरण येथे घडली. यात अल्पवयीन दोघी मुली सख्ख्या बहिणी आहेत. घरच्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा थांगपत्ता न लागल्यामुळे उरण पोलिसांत हरविल्याची तक्रार दाखल केली आहे.
अनंत यशवंत भरणे (रा.म्हातवली-उरण) यांची मुलगी आकांक्षा (वय 17) ही एन.आय. हायस्कूल या शाळेत अकरावीच्या अ‍ॅडमिशनसाठी गेली होती. बराच उशीर झाला तरी आकांक्षा परत न आल्यामुळे तिची आई सौ.भरणे तिला शाळेत बघायला गेली. शाळेत आकांक्षा दिसली नाही म्हणून भरणे यांनी लहान मुलगी अनुष्का (वय 15) जी याच शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकते, तिला विचारायला गेली. मात्र यावेळी अनुष्काही वर्गात नसल्याचे लक्षात आले.
दोन्ही मुली शाळेत नाहीत हे पाहुण सौ.भरणे हादरुन गेल्या. त्यातच शिक्षकांनीही अनुष्का वर्गात न आल्याची माहिती दिली आणि त्यांना सुचेनासे झाले. आपल्या दोन मुली कुठे गेल्या, याची चौकशी भरणे दाम्पत्य करीत सुटले. सर्व नातेवाईकांना फोन करुन विचारणा केली. मात्र या दोघींचा कुठेच ठावठिकाणा सापडला नाही. शेवटी त्यांनी घराशेजारी राहणारी मुलींची मैत्रीण सोनल दिलीप पिंगळे (वय 21) हिला फोन केला. धक्कादायक म्हणजे तिचाही फोन बंद होता.
सोनल चौदावीत प्रवेश घेण्यासाठी फुंडे येथे जाण्यासाठी घरातून निघाली होती. तिही घरी परत आली नाही. आपल्या दोन मुली तसेच त्यांची मैत्रीण सोनल गेल्या कुठे? या विचाराने भरणे व पिंगळे कुटुंबियांची झोप उडाली आहे. त्यात सोनलचा फोन बंद येत असल्याने काळजीत भर पडली आहे. संध्याकाळपर्यंत वाट बघुनही मुली घरी न आल्याने या दोन मुलींचे वडील अनंत भरणे यांनी आपल्या दोन मुली व त्या मुलींची मैत्रीण सोनल हरविल्याची तक्रार उरण पोलिस ठाण्यात केली आहे.
याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही.आर. पाटील तपास करत असून सदर मुलींची कोणाला ओळख पटल्यास त्यांनी उरण पोलिस स्टेशन फोन 022-27222366 अथवा त्यांचे वडील अनंत भरणे-9819831889, सन्नी बंड़ा-8879748855 या नंबरशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
4/5 - 1
You need login to vote.
Filed in

चिर्ले परिसरात जाळ्यामध्ये अडकलेल्या भेकराची

उरणमध्ये वीज वितरणचा सावळागोंधळ सुरूच

Related posts
Your comment?
Leave a Reply