मुसळधार पाऊस, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

546 Viewed Raigad Times Team 0 respond

खोपोलीत दोन ठिकाणी भिंत कोसळून वाहनांचे नुकसान

खोपोली । वार्ताहर । खालापूर तालुक्या सह खोपोली शहरात गेली दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन चांगलेच विस्कळीत झाले आहे. त्यातच रविवारी सकाळी खोपोली शहरातील इंडिया स्टील कंपनी ची भिंत कोसळून पाच वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे
गेली दोन दिवस मुसळधार पाऊसने सर्वत्र पाणीच पाणी करून टाकले आहे पाउसाची संततधार सुरूच राहिल्याने तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. पाताळगंगा, बाळगंगा नदी दुथडी भरून वाहत असून नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरणे, धबधबे यांचेवर गर्दी
मोरबे, डोणवत, कलोते, आत्कारगाव धरण पातळीत कमालीची वाढ झाली आहे. पाऊस दमदार कोसळत असल्याने त्याचा परिणाम दिसून येत असला तरी विकेन्ड एन्जॉयसाठी घराबाहेर पडणार्‍यांची संख्या तालुक्यातील लहान मोठ्या धबधब्यांवर तर खोपोली शहरात आणणार्‍या झेनित धबधब्यावर दिसून येत आहे पर्यटकांनी पावसात मात्र चांगलेच एन्जॉय केले.
इंडिया स्टील कंपनीची भिंत कोसळली
दरम्यान रविवारी सकाळी खोपोली शहराच्या सिद्धार्थ नगर परिसरात असणार्‍या इंडिया स्टील कंपनीची गावाच्या रस्त्या लगत असणारी पन्नास फूट लांबीची भिंत कोसळण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रस्त्यावर उभ्या असणार्‍या दोन कार, एक टेम्पो तर दोन रिक्षा यांचं यात प्रचंड नुकसान झाले आहे. ही घटना सकाळी 7 च्या दरम्यान घडल्याने सुदैवाने जीवित हानी टळली असून स्थानिक वाहनधारकांचे मात्र यात चांगलेच नुकसान झाले आहे तर नगरपालिका शाळा क्र.1 ची भिंतीचा काही भाग ही कोसळल्याने एक कार तर एक बाईक यांचे नुकसान झाले आहे.
इंडिया स्टील कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात लोखंडावर प्रक्रिया केल्यानंतर त्यातून जमा होणारा मातीसारखा दिसणार स्लचचा ढिगार्‍याचा ताण भिंतीवर आल्याने हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. तर हा ढिगारा लवकरच न दूर हटवला तर पूर्ण ढिगारा खाली येण्याचा धोका निर्माण झाला आहे. हा ढिगारा हटविण्याची मागणी होत असून कंपनीने नुकसानग्रस्त वाहनधारकांना आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे. या गंभीर घटनेची दखल तहसीलदार राजेंद्र चव्हाण आणि मुख्याधिकारी दीपक सावंत यांनी घेऊन तलाठी यांनी पंचनामा केला आहे तर नागरिकांना खबरदारीचा सूचना केल्या आहेत. दरम्यान इंडिया स्टील कंपनीबाबत नागरिकांमध्ये चांगलाच असंतोष या घटनेमुळे निर्माण झाला आहे.
विनानगरमध्ये रस्त्यावर पाणी
खोपोली शहराच्या विनानगर भागात खाजगी विकासकाने मातीचा भराव केल्याने पाणी थेट रस्त्यावर साचले होते या भागातील राहिवाशांनी अनेकदा आंदोलने करून प्रशासनाने दखल न घेतल्याने रस्त्यावर पाणी साचले होते. दरम्यान या भागातील राहिवाशांनी आपत्ती व्यवस्थापन आपली नाराजी व्यक्त केली. दरम्यान याला जबाबदार असणार्‍यावर कारवाईची मागणी सेनेचे कार्यकर्ते संदीप पाटील यांनी केली आहे.
एक्स्प्रेसवर वाहतूक धीम्या गतीने
मुसळधार पाऊस आणि त्यात विकेन्डसोबत आल्याने एक्स्प्रेस वे वरील वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. घाट सेक्शनला वाहनांच्या सकाळी रांगा लागल्या होत्या. तर मुंबईकडे जाण्यासाठी आडोशी बोगद्याजवळ दरड प्रवण क्षेत्र असल्याने खबरदारी म्हणून दोन लेन बंद केल्याने एक लेन वर वाहतूक सुरळीत होताना ताण पडला होता.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
4/5 - 1
You need login to vote.

खोपोलीतील वीज वितरणचा हलगर्जीपणा

आर्वी लॉजिस्टीकचे रॉयल्टी बुडवून उत्खनन

Related posts
Your comment?
Leave a Reply