उरणमधील संशयितांचे रेखाचित्र जारी

361 Viewed Raigad Times 0 respond

मुंबई । रायगड जिल्ह्यातील उरणच्या नौदल तलााजवळ पाच ते सहा बंदूकधारी संशयितची मुंबई पोलिसांनी संंशयितांंचे रेखाचित्र जारी केले आहे.
उरणसंदर्भात सर्व अहवाल उद्यापर्यंत सादर करा, असे गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी पोलिस महासंचालकांना आदेश देण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी संंशयितांंचे रेखाचित्र जारी केले आहे. पोलिस, नौदलासह कडूनही शोधमोहिम सुरु आहे. मुंबईसह नवी मुंबईत हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
उरणमध्ये क्यूआरटी, क्राईम ब्रान्च, नौदल, पोलिस, कोस्टल पोलिस सीआयएसएफची तुकडी यांचे एकत्रित सर्च ऑपरेशन सुरु आहे. उरीमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 18 सैनिक शहीद झाल्याच्या घटनेला चारही दिवस उलटले नाही तोच उरण नौदल तळाजवळ सशस्त्र लोकांच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्याने हा हाय अलर्ट जारी करण्यात आला. शोधमोहीम सुरू करण्यात आली असून संशयितांचा सुगावा लागलेला नाही.
या घटनेनंतर एनएसजी, फोर्स वन हे राज्य सरकारचे विशेष प्रशिक्षित पोलिस दल आणि एटीएस, नौदलाचे मार्कोस हे मरीन कमांडोज, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा यासारख्या दलांना शोधमोहीम आणि सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे.
या माध्यमातून व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली असल्याचे भारतीय नौदलाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कॅप्टन डी.के. शर्मा यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच नौदलाने तातडीने हाय अलर्ट जारी केला आणि किनारपट्टीच्या सर्व संस्थांना माहिती दिली, असे नौदलाचे प्रवक्ते कमांडर राहुल सिन्हा म्हणाले. किनारपट्टीच्या सर्व पोलिस ठाण्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आल्याचे राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी सांगितले.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.
Filed in
prev-next.jpg

विजेच्या धक्क्याने दाम्पत्याचा मृत्यू

शिवसेना रायगड जिल्हा प्रमुखपदी आ.मनोहर भोईर

Related posts
Your comment?
Leave a Reply