एशियन बीच गेमसाठी महाराष्ट्राचे 6 खेळाडू व्हिएतनामला रवाना

366 Viewed Raigad Times 0 respond

नागोठणे । वार्ताहर । 45 देशांचा सहभाग असलेली पाचवी एशियन बीच गेम स्पर्धा 24 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान व्हिएतनाम देशातील दा नांग शहरात होत असून भारतीय ऑलिम्पिक संघाच्यावतीने 117 खेळाडू सहभागी होत आहेत. या एशियन बीच गेमसाठी महाराष्ट्राचे 6 खेळाडू व्हिएतनामला रवाना झाले आहेत.
मुग्धा लेले, निधी राऊत, ललिता सिंग, प्रिया गुरव, संतोष गुरव, प्रदीप साखरे, प्राची,सोनिया, संजिता, जुंगमिंदरसिंग शेओखंड, सीमा राणी, दश सुशांता हे खेळाडू पेंटाक्यू या खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या संघातून खेळणारे 6 खेळाडू महाराष्ट्रातील असून हा संघ शुक्रवारी (दि.23) सायंकाळी मुंबईहून व्हिएतनामकडे रवाना झाला. वुडबॉलचा संघसुद्धा शुक्रवारी रवाना झाला असून त्यात नागोठणे, रायगडचे भरत गुरव हे एकमेव खेळाडू आहेत. एशियन बीच गेममध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.
Filed in

वाकण-पाली मार्गावर अपघात; 3 गंभीर जखमी

prev-next.jpg

शिहू येथे नवरात्रौत्सवास प्रारंभ

Related posts
Your comment?
Leave a Reply