उरण ः ‘थ्रील’ अनुभवण्यासाठी ‘तिने’ अफवा पसरवली?

145 Viewed Raigad Times 0 respond
single-thumb.jpg

उरण । उरण परिसरात शस्त्रधारी इसम दिसल्याची माहिती खोटी असल्याची माहिती समोर आली आहे. ‘थ्रील’ अनुभवण्यासाठी एका 12 वर्षांच्या शाळकरी मुलीने ही अफवा पसरवली, अशी धक्कादायक आणि तितकीच संतापजनक माहिती एका तपास अधिकार्‍याने दिली आहे. केलेली चूक मान्य केल्यानंतर या मुलीला समज देऊन सोडण्यात आले, असेही तपास अधिकार्‍यांनी सांगितले.
अफवा पसरवणार्‍या मुलीने काही दिवसांपूर्वी इस्लामिक स्टेटच्या शस्त्रधारी दहशतवाद्यांचे फोटो पाहिले होते. फोटो पाहिल्यानंतर तिने उरणमध्ये पठाणी सुट घातलेले, वेगळ्या भाषेत बोलणारे आणि शस्त्रधारी 4-5 संशयित पाहिल्याची अफवा पसरवली. उरी दहशतवादी हल्ल्यात 18 जवान शहीद झाल्याची घटना चार दिवसांपूर्वीच घडली होती. त्यामुळे उरणमध्ये संशयित व्यक्ती दिसल्याची माहिती दुर्लक्षित करुन चालणार नव्हती असे अधिकार्‍याने सांगितले आहे.
दहशतवादी शिरल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने तपास यंत्रणांनी मुंबईसह राज्यभरात हाय अलर्ट जारी करत शोधमोहीम सुरू केली. मात्र शोधमोहीमेदरम्यान संशयित असे काहीही आढळले नाही. दरम्यान, अशा अफवांमुळे तपास यंत्रणांचा वेळ आणि पैसा विनाकारण खर्च होतो, हेदेखील नागरिकांनी कळले पाहिजे, असे तपास अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.
Filed in
mla

शिवसेना रायगड जिल्हा प्रमुखपदी आ.मनोहर भोईर

Related posts
Your comment?
Leave a Reply