शिहू येथे नवरात्रौत्सवास प्रारंभ

नागोठणे । वार्ताहर । विभागात पेण तालुक्यातील शिहू येथील श्री बहिरेश्वर मंदिरात आज शनिवारपासून सकाळी 10 वाजता अंबा माता,बहिरेश्वर आणि जोगेश्वरीमाता या देवतांची घटस्थापना करून नवरात्रौत्सवास प्रारंभ होत आहे. 1 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान चालणार्या या धार्मिक उत्सवात श्री बहिरेश्वर महिला भजन मंडळ, श्री जोगेश्वरीमाता महिला मंडळ (शिहू), प्रासादिक भजन मंडळ (चोळे), श्री दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ (चोळे), श्री लक्ष्मी नारायण भजन मंडळ (मुंढाणी), श्रीराम भजन मंडळ (जांभूळटेप), विभागीय वारकरी भजन मंडळ यांची संगीत भजने, महिलांचे नाचांचे सामने, महिला व मुलांसाठी खेळ, होम मिनिस्टर, गरबा,फॅन्सी ड्रेस स्पर्धा असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. बुधवार 12 ऑक्टोबरला सायंकाळी अंबा खाडीत विसर्जन सोहळा संपन्न होणार आहे. श्री बहिरेश्वर युवक मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
Your comment?