पेणचे माजी सभापती संजय भोईर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

249 Viewed Raigad Times 0 respond
single-thumb.jpg

ग्रामपंचायतीमध्ये गैरव्यवहार केल्याचा ठपका

नागोठणे । वार्ताहर । शिहू ग्रामपंचायत हद्दीत नळ पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले नसतानाही कामाचा निधी दिल्याप्रकरणी पेण तालुका पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य संजय भोईर आणि इतरांवर नागोठणे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. भोईर यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली तेथे त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावण्यात आला.
विभागातील शिहू ग्रामपंचायत हद्दीतील गांधे-चोळे आणि शिहू-आटीवली या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी साधारणतः आठ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. सदर काम काराव, गडब येथील काळंबादेवी मजूर सहकारी संस्थेला देण्यात आले होते. सदर काम झालेले नसतानाही प्रत्यक्षात काम पूर्ण झाले असल्याबाबतचा निधी संबंधित संस्थेला अदा करण्यात आला होता. या प्रकरणात भ्रष्टाचार झाला असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागोठणे पोलिस ठाण्यात 42/ 2015 अन्वये 28 मे 2015 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर या प्रकरणात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे तीन अधिकारी तसेच अनंत कुथे आणि घनश्याम कुथे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौकशीअंती संजय भोईर यांचासुद्धा या प्रकरणात हात असल्याचे दिसून आले त्यामुळे भोईर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेला निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.
भोईर यांना आज, गुरुवारी पेण न्यायालयात हजर करणार असून चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी करणार असल्याचे पोलिस निरीक्षक दरेकर यांनी सांगितले.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.
Filed in
prev-next.jpg

शिहू येथे नवरात्रौत्सवास प्रारंभ

Related posts
Your comment?
Leave a Reply