राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील भाजपमध्ये

2403 Viewed Raigad Times 0 respond

शेकाप-राष्ट्रवादी आघाडी मान्य नसल्याने घेतला निर्णय

पनवेल । वार्ताहर । राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील यांनी काही पदाधिकार्‍यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्ह्यात शेकाप व राष्ट्रवादीची झालेली आघाडी त्यांना मान्य नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.
मुंबई येथील पक्ष कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात राज्याचे गृह व जलसंधारण राज्यमंत्री राम शिंदे यांनी त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. अश्विनी पाटील यांच्यासह खोपोलीचे माजी नगराध्यक्ष रोहिदास पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन पवार यांनीही राष्ट्रवादीला सोडचिट्ठी दिली.
प्रवेश करताना रामशेठ ठाकूर, रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, खालापूर तालुका अध्यक्ष एकनाथ पिंगळे, जिल्हा चिटणीस शरद कदम, अविनाश कोळी, प्रदीप लाड, सरचिटणीस सनी यादव, प्रसाद विध्वांस आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला खोपोलीत मोठा हादरा आहे. खोपोलीत शेकाप विरूध्द राष्ट्रवादी असे राजकारण रंगते असे असताना या दोघांची झालेली आघाडी कार्यकर्त्यांना सुचलेली नाही.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.
prev-next.jpg

पंचायत समिती आरक्षण

prev-next.jpg

जिल्हा परिषदेचे आरक्षण पुन्हा पडणार

Related posts
Your comment?
Leave a Reply