जिल्हा परिषदेचे आरक्षण पुन्हा पडणार

2517 Viewed Raigad Times 0 respond
single-thumb.jpg

खारघरसह पाच गावे पनवेल महानगरपालिकेतच!

आता 59 जागांसाठी होणार नव्याने आरक्षण

अलिबाग । प्रतिनिधी ।  खारघरचा विकास आणि रचना याचे सर्व अधिकार सिडकोकडे राहणार असून तशी अधिसूचनाच राज्य सरकारने काढली आहे. खारघरचा विकास सिडकोअंर्तगत व्हावा, अशी मागणी करणारी याचिका नायालयात दाखल करण्यात आली होती; मात्र याची अंतिम सुनावणी होण्यापूर्वीच राज्य सरकारने ही अधिसूचना काढल्यामुळे खारघरसह पाच गावे पनवेल महानगरपालिकेतच राहणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषदेचे आरक्षणही पुन्हा काढण्यात येणार, हे निश्‍चित झाले आहे.

खारघरचा विकास सिडकोअंर्तगत व्हावा आणि खारघरसाठी वेगळी नगरपालिका निर्माण करावी, या मागणाीसाठी खारघर बचाव समितीने न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचा निकालही लवकरच अपेक्षीत आहे. मात्र त्याआधीच राज्य सरकारने एक मागणी पूर्ण करत, खारघरसह तळोजा, पाचनंद, ओवे, नावडे आणि पेंधर या गावांचा विकास व आराखडे सिडकोअंर्तगत होतील, अशी अधिसूचना काढली आहे. तसे करताना ही गावे पनवेल महानगरपालिकेतच राहणार, असे या अधिसूचनेत नमूद केले आहे. त्यामुळे एक मागणी पूर्ण झाली आहे.
पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेचे दोन गट महानगरपालिकेतच राहणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. रायगड जिल्हा परिषदेचे 61 जागांसाठीचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्याात आले होते. ते आरक्षण पुन्हा बदलावे लागणार आहे. आता 59 जागांसाठी आरक्षण होणार आहे. आरक्षण बदलल्यामुळे अनेकांच्या तोंडाशी आलेला घास हिरावण्याची तर काहींना पुन्हा लॉटरी लागण्याची शक्यता झाली आहे.
राज्यभरात जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे कार्यक्रम निवडणूक आयोगाने एकाच वेळी जाहीर….

केलेले असल्यामुळे त्यानुसार अंमजबाजावणी जिल्हाधिकार्‍यांनी केली. रायगडात मात्र जिल्हा परिषदेचा एक पाय पनवेल महानगरपालिकेत अडकला होता. खारघर बचाव समितीने आपल्याला पनवेलमधून वगळावे आणि सिडकोच्या अंतर्गत अथवा स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी करत न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे आरक्षण जाहीर केल्यानंतरही न्यायालयाच्या निर्णयावर सर्व अवलंबूून होते. मात्र सरकारच्या या निर्णयानंतर पनवेल महानगरपालिका आणि जिल्हा परिषद या दोन्ही स्थानिक संस्थांमधील रेषा स्पष्ट झाली आहे. आरक्षणानंतर पुढची प्रक्रियाही जिल्हा प्रशासनाने थांबवली असल्याचे समजते.
याआधी रायगड जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समित्यांसाठीचे आरक्षण सोमवारी (दि.24) जाहीर करण्यात आले होते. आरक्षण पडताच अनेक इच्छुकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. यामध्ये जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष कर्जतचे सुरेश टोकरे, विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे, चंद्रकांत कळंबे, माणगावचे अ‍ॅड.राजीव साबळे, अलिबाग तालुक्यातील झिराडचे दिलीप भोईर (छोटमशेट), अ‍ॅड.आस्वाद पाटील, बोर्लीपंचतनचे शामकांत भोकरे यांच्या जागांवर आरक्षणाचे गंडातर होते. त्यामुळे या सर्वांना आता दुसरा मतदार शोधणे अथवा घरी बसण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र आता पुन्हा आरक्षण पडणार असल्यामुळे अनेकांच्या आशा उंचावल्या आहेत.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील भाजपमध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रायगडात

Related posts
Your comment?
Leave a Reply