जिल्हा बँकांना नोटा बदलण्याची मुभा नाहीच

315 Viewed Raigad Times 0 respond

सहकारी बँका काळा पैसा पांढरा करण्याचे केंद्र बनतील…

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली निर्णयावर ठाम

नवी दिल्ली । चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास आणि चलनबदल करण्यास सहकारी बँकांना कदापी परवानगी देणार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी स्पष्ट केले. ते गुरूवारी (दि.17) दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी जेटली यांनी सहकारी बँकांवर घातलेली बंदी उठविण्यास नकार दिला. अशी परवानगी दिली गेल्यास सहकारी बँका काळा पैसा पांढरा करण्याचे केंद्र बनतील, असे जेटली यांनी सांगितले.

रिझव्ह बँकेने परिपत्रक काढून जिल्हा सहकारी बँकांना रोकड स्वीकारण्यास आणि चलनबदल करण्यास बंदी घातली होती. राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रीयकृत किंवा खासगी बँकांचे जाळे नसल्यामुळे सहकारी बँकांवरील ही बंदी मागे घेण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडूनही ही मागणी उचलून धरण्यात आली आहे. शिवसेनेच्या खासदारांनी बुधवारी (दि.16) राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना दिलेल्या निवेदनात याबद्दल उल्लेख करण्यात आला होता. मात्र, सरकारने सहकारी बँकांवर जुनी रोकड स्वीकारण्यास घातलेली बंदी उठवण्यास ठाम नकार दिल्याने जिल्हा बँकांचे धाबे दणाणले आहेत.
खेड्यापाड्यांमध्ये राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षा जिल्हा बँकांच्या शाखा सर्वाधिक आहेत. खेड्यातील शेतकरी, ग्रामस्थ, सेवा सोसायट्या, दूध उत्पादक संघ, भाजीपाला, किराणा विक्रेते यांचे दैनंदिन व्यवहार जिल्हा बँकांच्या माध्यमातून होतात. रिझर्व्ह बँकेने ग्रामीण अर्थकारणाचा पाया असलेल्या ठाणे जिल्हा बँकेवर नोटा स्वीकारण्यास बंदी घातल्यामुळे ग्रामीण अर्थकारण कोलमडले आहे, अशी टीका जिल्हा बँकांचे पदाधिकारी, गाव-खेड्यांतील व्यापारी, व्यावसायिक शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, आजच्या पत्रकार परिषदेतील अर्थसचिवांच्या घोषणेमुळे शेतकर्‍यांनाही दिलास मिळाला आहे. शेतकर्‍यांना खते-बियाणे, शेतीसंबंधीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी कर्जाच्या रकमेतून आठवड्याला 25 हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच पीक विम्याचा हफ्ता भरण्याच्या मर्यादेतही 15 दिवसांची वाढ करण्यात आल्याचे दास यांनी नमूद केले.

लग्नासाठी अडीच लाख रुपये काढता येणार

 

 

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.
Filed in

आता फक्त साडेचार हजारांपर्यंतच्या जुन्या नोटा बदलता येणार

दुसर्‍याचे पैसे खात्यात भराल तर अडचणीत याल

Related posts
Your comment?
Leave a Reply