दुसर्‍याचे पैसे खात्यात भराल तर अडचणीत याल

405 Viewed Raigad Times 0 respond
An employee arranges currency notes at a cash counter inside a bank in Agartala February 18, 2010. REUTERS/Jayanta Dey/Files

नवी दिल्ली । नोटबंदीच्या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणावर काळा पैसा बाळगणार्‍यांकडून हा पैसा टिकवण्यासाठी आटापिटा सुरू आहे. हा पैसा बँक खात्यात भरण्यासाठी अनेकांकडून टक्केवारीसह आकर्षक प्रलोभने दाखवण्यात येत आहेत. पण तुम्हीही अशी रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा करण्याच्या विचारात असाल तर सावधान. अशी रक्कम तुम्हाला अडचणीत आणू शकते. काळा पैसा पांढरा करण्याची ही पळवाट असा पैसा भरणारे आणि भरण्यासाठी देणारे अशा दोघांनाही अडचणीची ठरू शकते, असा इशारा सरकारने दिला आहे.
500 आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्यापासूनच काळी माया गोळा करणार्‍यांची धावपळ सुरू झाली होती. त्यातील काही जणांनी हे पैसे आपल्या ओळखीपाळखीच्या लोकांच्या खात्यात जमा करण्याची शक्कल काढली. तर काही जणांनी त्यासाठी ठरावीक रक्कम देण्याचे आमिषही दाखवले. विशेषत: शून्य शिलकीच्या जनधन खात्यांमध्येही अशी रक्कम मोठ्या प्रमाणात भरण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळेच ही चालाखी लक्षात आल्यानंतर सरकारकडून त्याविरोधात कठोर पावले उचलण्यात आली आहेत. दुसर्‍याच्या खात्यात रक्कम जमा केल्यास किंवा अशी रक्कम जमा करवून घेतल्यास संबंधितांवर आयकर कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई केली जाईल.

पेट्रोल पंपावर मिळणार 2 हजारापर्यंत रोख

नवी दिल्ली । देशातल्या जवळपास अडीच हजार पेट्रोल पंपांवर ग्राहकांना त्याचं डेबिट कार्ड स्वाईप करून दोन हजार रुपयांची रोख रक्कम उपलब्ध होणार आहे.स्टेट बँक आणि तीन सरकारी इंधन विक्री कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. ज्यांना रोख रकमेची गरज आहे… त्यांनी आपलं डेबिट कार्ड पेट्रोल पंपावर स्वाईप केल्यावर पेट्रोल पंप चालक त्यांना दोन हजार रुपये देतील. आजपासून स्टेट बँकेच्या पॉईंट ऑफ सेल स्वाईप मशीन उपलब्ध असणार्‍या जवळपास अडीच हजार पेट्रोल पंपावर ही सुविधा मिळेल. पण, येत्या काही दिवसांत इतर बँकाही सुविधा सुरू करतील अशी आशा पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशननं व्यक्त केली आहे.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.
Filed in

जिल्हा बँकांना नोटा बदलण्याची मुभा नाहीच

prev-next.jpg

3590 कोटींचा काळा पैसा उघड, 93 कोटींच्या नव्या नोटा जप्त

Related posts
Your comment?
Leave a Reply