माथेरानमध्ये सत्ताबदलाचे वारे…

2045 Viewed Raigad Times 0 respond
single-thumb.jpg

शिवसेनेची जोरदार तयारी

माथेरान । वार्ताहर । माथेरान पालिकेच्या निवडणुकीची रंगत वाढली असून सत्ता हातात घेण्यासाठी स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणारी शिवसेना सरसावली आहे. प्रत्येक प्रभागात शिवसेनेचे स्थानिक नेते उमेद्वारांसह मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत. प्रभाग सहा आणि सातच्या प्रचारफेरीला मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याने या दोन्ही प्रभागात सेनेचे धनुष्य जोरात सुटले आहे.
शिवसेनेच्यावतीने प्रभाग सहाचे उमेदवार संदीप कदम, प्रतिभा घावरे आणि प्रभाग सातचे उमेदवार आकाश चौधरी, सुषमा जाधव यांच्यासाठी प्रचार फेरी आयोजित केली. विरोधकांना शह देण्यासाठी उमेदवारांसह नेते मंडळी प्रत्येकाच्या घराघरात जाऊन मतदार राजाच्या भेटीगाठी घेत आहेत. मतदारांचा विश्वास संपादन करुन यावेळेस विरोधकांना मोठा धक्का देत माथेरान नागरपरिषदेमध्ये सत्ताबदल झाला पाहिजे. त्यासाठी आता नाही तर कधी नाही असा प्रचार फेरीचा मुख्य मुद्दा आहे.
प्रभाग क्रमांक 6 मधून शिवसेनेचे उमेदवार आकाश चौधरी हे तीन दशकाहुंन अधिक नवरतरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष असून त्याच्या पाठीमागे तरुण वर्गाचा भरगच्च पाठींबा आहे. त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव मंडळाचे ही एक दशकाहुन अधिक काळ अध्यक्ष पद आहे. स्वच्छ व मनमिळावू स्वभाव नेहमीच शांत सगळ्यांना सोबत घेऊन काम करणारे आकाश चौधरी हे नेहमीच माथेरानच्या तरुणापासून ते वृद्धापयर्र्ंत सर्वांची चॉईस ठरत असून माथेरानमध्ये सध्या त्यांच्या नावाची एकच चर्चा चालू आहे. क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष कुलदीप जाधव यांच्या पत्नी सुषमा जाधव हया उमेदवार उभ्या आहेत. कुलदीप जाधव यांचे मराठा समाजासाठी तसेच अन्य समाजातसुद्धा भरीव योगदान आहे. त्यामुळे या भागात मराठा समाजसह अन्य समाजाची मंडळी त्यांच्या बाजूनेच कौल देण्याच्या तयारीत असल्याचे सर्वच मतदार आणि त्या भागातील नागरिक बोलत आहेत.
प्रभाग 6 मधुन अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिवसेनेतून उमेदवारी मिळविलेल्या संदीप कदम यांची उमेदवारी प्रबळ मानली जात आहे. त्या प्रभागात सर्वसाधारण महिला वर्गासाठी मराठा समाजाचे माजी अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रदीप घावरे यांच्या पत्नी माजी उपनगराध्यक्ष प्रतिभा घावरे या निवडणुकीच्या रिंगनात उतरल्या आहेत. दांडगा जनसंपर्क आणि प्रशासनाचा तसेच संघटनात्मक अनुभवी म्हणून प्रतिभा घावरे या अगोदर ह्याच वर्षी शिवसेनेच्या तिकीटा वर निवडून आल्या होत्या. गेल्याच वर्षी नगरसेवक ते उपनगराध्यक्ष पदापयर्र्ंत मजल मारित नगरपरिषदेत स्वताचा ठसा उमटवला आहे. नेहमीच प्रदीप घावरे यांच्या खांद्याल खांदा लाउन अन्य समाजात ही सुख दुःखाला धावणार्‍या प्रतिभा घावरे या नावाने सर्वांच्या परिचयाच्या असून त्याच्या पाठीमागे मोठा जनसमुदाय आहे.
शिवसेनेच्या झंझावात प्रचार फेरीत माथेरान शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी, संपर्क प्रमुख प्रसाद सावंत, प्रचार प्रमुख प्रदीप घावरे, ज्यांच्या शब्दाला वजन आहे ते प्रदीप उर्फ पप्पू दिवाडकर, शिवसेनेची प्रचाराची धुरा ज्यांनी खांद्यावर घेतली आहे ते माजी नगराध्यक्ष दिलीप गुप्ता, शिवसेना संघटक प्रवीण सकपाळ, उप नगराध्यक्षा विनिता गुप्ता, माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी,विजय चौधरी, जेष्ठ कार्यकर्त्या जयश्री शिंदे, प्रियंका काळे, कल्याणी चौधरी, सुवासिनी शिंदे, वर्षा काळे, जेष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण कदम, गणेश कदम, प्रवीण पाटील गणेश कदम, अण्णा शिंदे, विकास पार्टे, शैलेश चाफेकर आदि उपस्थितीत होते. या संपूर्ण भागात शिवसेनेचा दबदबा असल्याने हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे ही निवडणुक जिंकन्याची संधी चालून आली आहे, अशी तेथील स्थानिकांमध्ये चर्चा सुरु आहे.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.
prev-next.jpg

माथेरान नगरपालिका निवडणूक

नेरळ-माथेरान नॅरोगेज मार्गाची दुरुस्ती लवकर पूर्ण करा

Related posts
Your comment?
Leave a Reply