3590 कोटींचा काळा पैसा उघड, 93 कोटींच्या नव्या नोटा जप्त

166 Viewed Raigad Times 0 respond
single-thumb.jpg

नवी दिल्ली ।  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आयकर विभागाने काळ्या पैशांविरोधात देशभरातील 760 ठिकाणी छापे टाकले. या छापासत्रात आतापर्यंत 505 कोटींची रोकड जप्त केली आहे. त्यात नव्या नोटांचे मूल्य तब्बल 93 कोटी रुपये आहेत. आयकर विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, 3590 कोटींहून अधिक काळा पैसा उघड झाला आहे. तर आयकर विभागातर्फे संबंधितांना 3589 नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर रोजी काळ्या पैशांविरोधात लढाई पुकारली. त्यासाठी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी त्याच दिवशी मध्यरात्रीपासूनच करण्यात आली. केंद्र सरकारच्या काळ्या पैशांविरोधातील लढाईला आयकर विभागानेही साथ देत देशभरात छापेमारी सुरू केली. आयकर विभागाने 760 ठिकाणी छापे टाकले. 505 कोटी रुपये जप्त करण्यात आले असून, त्यात तब्बल 93 कोटी रुपयांच्या नवीन नोटांचा समावेश आहे. तर 3590 रुपयांचे काळे धन उघड केले आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी झाली असून, त्यातील 400 प्रकरणे पुढील चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालय आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आली आहेत. त्यातील ईडीकडे 215 तर सीबीआयकडे 185 प्रकरणांचा समावेश आहे.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.
Filed in
An employee arranges currency notes at a cash counter inside a bank in Agartala February 18, 2010. REUTERS/Jayanta Dey/Files

दुसर्‍याचे पैसे खात्यात भराल तर अडचणीत याल

Related posts
Your comment?
Leave a Reply