दिवेआगर समुद्रकिनारी केतकी बनाला आग

235 Viewed Raigad Times 0 respond
diveaagar-aag2

अज्ञात व्यक्तीने सिगरेट टाकल्याचा संशय
सेफ्टी अग्नीशमन बंबाचा व पाण्याचा वापर
3 तासांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात

बोर्लीपंचतन । वार्ताहर । श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर येथील समुद्रकिनार्यावर असलेल्या केतकीच्या बनाला शुक्रवारी (ता.23 )रोजी 12 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने एकच खळबळ परिसरात उडाली होती; परंतु व्यावसायिक, ग्रामस्थ व ग्रामपंचायत सद्स्यांच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात आली असून अज्ञात व्यक्तीने सिगरेट किंवा विडी ओढून बनात टाकल्याने आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दिवेआगर समुद्रकिनारी रुपणारायण मंदिर व तलाणी विभागात असलेल्या केतकीच्या बनाला दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचे समजताच दिवेआगर ग्रामपंचायत सदस्य व व्यावसायिक ग्रामस्थ यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी सेफ्टी अग्नीबंबाचा व पाण्याचा वापर करून 3 तासाच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. तर समुद्रकिनारी आलेल्या अज्ञात व्यक्तीने सिगरेट किंवा विडी ओढून केतकीच्या बनात टाकल्याने आग लागली असावी असा अंदाज असल्याचे ग्रामसेवक रविंद्र काळे यांनी माहीती देताना सांगितले तसेच घडलेल्या प्रकारा बाबत पंचायत समितीला कळवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रसंगी सरपंच नम्रता रसाळ, सदस्य शर्मिला करमरकर, तंटामुक्त गाव अध्यक्ष देवेंद्र नार्वेकर, महेश पिळणकर, नाना सुर्वे, संतोष भगत, जीव सुरक्षा रक्षक प्रीतम भुसाणे, रतीश जंजीरकर, सुबोध पाटील आदि ग्रामस्थांनी मदत कार्य केले.आग मोठ्या प्रमाणात नसली तरी वार्‍याने केतकी जळून गेली आहे तर काही वर्षापूर्वी देखील केतकीचे बन अशाच प्रकारे जळून गेले होते. तेव्हाही ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व पोलीस यांनी मोठया प्रयत्नाने आग आटोक्यात आणली होती.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.
photo

श्रीवर्धनमध्ये शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांचे राजीनामे

Related posts
Your comment?
Leave a Reply