मोटारसायकलच्या अपघातात वानराचा बळी; चालक जखमी

2972 Viewed Raigad Times 0 respond

माणगाव। वार्ताहर । माणगाव येथे मुंबई गोवा महामार्गावर मोटारसायकलचा अपघात होऊन या आघातात मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला तर एका वानराचा बळी गेल्याची विचित्र घटना घडली आहे .
प्रत्यक्षदर्शी कडून मिळालेल्या माहिती नूसार गोरेगाव येथील निलेश कासरेकर हे कामानिमित्त माणगाव येथे आपल्या मोटार सायकलने जात होते. त्यांची मोटारसायकल महामार्गावरील हॉटेल रायगड दर्शन येथे आली असता बाजूच्या झाडीतुन उडया मारत आलेल्या वानराने त्याला धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की निलेश काचरेकर सुमारे 25 ते 3े फूट फरफटत जाऊन गंभीर जखमी झाले. दैव बलवत्तर म्हणून यावेळी महामार्गावर एकही वाहन जात येत नव्हते. मात्र या धडकेत धडक देणार्‍या वानराचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.
prev-next.jpg

माणगांवात अवैध दारु विक्रीविरोधात कारवाई

माणगांवमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचे वेध

Related posts
Your comment?
Leave a Reply