पनवेल रुग्णालयाचे जानेवारीत लोकार्पण

222 Viewed Raigad Times Team 0 respond

आमदार प्रशांत ठाकूर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा

पनवेल । वार्ताहर । येथील उपजिल्हा रुग्णालय जानेवारी 2018 मध्ये सुरु करण्याचे आश्वासन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री विजय देशमुख यांनी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना मुंबईत बुधवारी झालेल्या बैठकीत दिले. तसेच 15 दिवसांत पदेही भरली जातील, असे त्यांनी सांगितले.
पनवेल शहराचा झपाटयाने होत असलेला विकास होत असताना मोठया प्रमाणातील रहदारी आणि औद्याोगिकीकरणामुळे तालुक्यात वाढते अपघात लक्षात घेता 30 खाटांच्या ग्रामीण रूग्णालयाऐवजीे 100 खाटांचे उपजिल्हा रूग्णालय व ट्रॉमा केअर युनिट व्हावे, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे आग्रही मागणी केली होती. त्यासाठी सतत पाठपुरावा केला होता. याची दखल घेऊन शासनाने पनवेल येथे 100 खाटांचे सुसज्ज उपजिल्हा रूग्णालय तसेच 20 खाटांचे ट्रॉमा केअर युनिट स्थापन करण्याच्या निर्णय घेतला. त्यानुसार या रुग्णालयाचे काम सुरु असून रुग्णांच्या सेवेसाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालय लवकरात लवकर सुरु करण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांचा सातत्याने शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. या रुग्णालयाची सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करून लोकार्पण करावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या बैठकीत केली. या बैठकीस आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

News Feed
Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

उरणमध्ये चर्चा सरपंचपदाच्या उमेदवारांची

5 हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट

Related posts
Your comment?
Leave a Reply