अलिबाग-परहूरपाडा येथे…

412 Viewed Raigad Times Team 0 respond

तरुणाची हत्या!

तिघेे अटकेत; पोयनाड पोलिसांची कारवाई

अलिबाग | वार्ताहर | सर्वांत आधी जेवला या करणावरुन एका ३५ वर्षीय तरुणाची त्याच्या साथीदारांनी हत्या केल्याची घटना अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथे घडली. याप्रकरणी तिघांना पोयनाड पोलिसांनी अटक केली असून या सर्वांना अलिबाग न्यायालयात हजर केली असता त्यांना २० सप्टेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

अनिल उर्फ पिंट्या अंकुश वाघमारे असे या मृताचे नाव आहे. अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा गावातील कोपरडुंग आदिवासी वाडीवर हा राहत होता. शनिवारी (दि.१६ सप्टेंबर रोजी) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोपरडुंगी आदिवासीवाडीवरील लक्ष्मण शंकर नाईक यांच्या घरात धारदार अशा शस्त्राने अनिल वाघमारे याचा खून करण्यात आला. त्यानंत त्याचा मृतदेह खदानी शेजारील खड्ड्यात टाकून देण्यात आला होता.
याबाबत पोयनाड पोलीस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरु असताना पोयनाड पोलिसांनी तातडीने तपास करून विनोद लक्ष्मण नाईक (वय ४५) याला चरी येथून तर दिनेश उर्फ पप्या लक्ष्मण नाईक (वय ४०) आणि सुनीता दिनेश नाईक (वय ३४) या दोघांना शहापूर खाडी येथून ताब्यात घेतले.
मृत अनिल वाघमारे आणि आरोपी यांच्यात चुलतभावाचे नातेसंबंध होते. सर्वांच्या आधी जेवला म्हणून त्याचा वाद झाला आणि याच वादातून हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत पोयनाड पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.एल. शेवाळे करीत आहेत.

News Feed
Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

पनवेल तालुक्यात गुटखा बंदीचा उडाला फज्जा

पनवेलकर करातात…

Related posts
Your comment?
Leave a Reply