काम ठप्प; ग्रामपंचायत निवडणुकीला फटका

129 Viewed Raigad Times Team 0 respond

नागरिकांचे हाल

महसूल कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

| रायगड टाइम्स |
म्हसळा | महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचार्‍यांच्या कामबंद आंदोलनाचा फटका ग्रामपंचायत निवडणुकीला बसला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे हालही होत आहेत.

महसूल कर्मचार्‍यांनी निवडणुकीचे कामदेखील बंद केले आहे. ज्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त कोणीही निवडणुकीचे काम करणार नसल्याने निवडणूकसंबधी कामांचा संपूर्ण बोजवारा उडाला आहे. तसेच खेड्या- पाड्यातून व आंबेतसारख्या दुर्गम भागातून ३० – ४० कि.मी. लांबीचा प्रवास करून महसूलच्या कामानिमित्त येणार्‍या नागरिकांचे काम होत नसल्याने फार हाल होत आहेत. त्यातच महाराष्ट्र शासनाने आडमुठी भूमिका घेतल्याने कोतवाल, शिपाई, लिपिक, अव्वल कारकून, पदोन्नत नायब तहसीलदार असे महसूल विभागाचा कणा असणार्‍या कर्मचार्‍यांचा संप चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सर्व महसूल कर्मचारी आपापल्या वेळेवर आजही महसूल कार्यालयात आले. परंतु कोतवालपासून नायब तहसीलदारापर्यंत सर्वच कार्यालयीन कामकाज न करता कार्यालयाबाहेर ठांड मांडून बसले होते.

महसूल कर्मचार्‍यांचा काम बंद आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. शासनाने आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेमार्फत पुढील निर्देश येत नाहीत तोपर्यंत हे काम बंद आंदोलन सुरूच राहील.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

भाजपच्या किसान मोर्चाला आता गॅसलाईनबाधित शेतकर्‍यांचा पुळका

prev-next.jpg

एचओसी प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवणार

Related posts
Your comment?
Leave a Reply