माणगावात होणार 1 कोटींचे वारकरी भवन

42 Viewed Raigad Times Team 0 respond

शेतकरी नेते पंकज तांबे यांचा वारकर्‍यांसाठी निर्धार

। रायगड टाइम्स ।
माणगांव । माणगांव शहरातील बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणून ओळख असलेले स्वराज्य संघटनेचे संस्थापक शेतकरी नेते पंकज तांबे यांनी माणगांव तालुक्यातील वारकर्‍यांची गरज लक्षात घेत तालुक्यातील वारकर्‍यांना हक्काचे घर निर्माण व्हावे म्हणून निर्धार केला असून येत्या वर्षभरातच वारकरी भवन निर्माण केले जाईल, असे आश्वासन वारकरी सांप्रदायाला दिले आहे. या बैठकीस माणगाव तालुक्यातील वारकरी सांप्रदायाचे मुरकर महाराज, सुरेश टेंबे, निमण महाराज, पुरी महाराज, मुकूंद वाढवळ, संतोष मोरे यांच्यासह तालुकक्यातील अनेक वारकरी उपस्थित होते.

माणगाव तालुक्यात जवळपास पंचवीस हजार वारकरी असून या वारकर्‍यांना धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविता यावेत यासाठी स्वत चे व्यासपिठ नाही. अनेक वर्षांपासून माणगावात वारकरी भवन उभारण्यासाठी मागणी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनाकडे मागणी करीत होते. शेतकरी नेते पंकज तांबे यांना ही मागणी समजल्यानंतर त्यांनी माणगाव तालुक्यातील वारकरी सांप्रदायाची बैठक आपल्या निवासस्थानी गुरुवारी (दि.7) आयोजित केली होती. त्यावेळी स्वराज्य संघटनेकडून उपस्थित वारकर्‍यांचा शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
वारकरी संप्रदाय आपली हजारो वर्षांची पररंपरा व संस्कृती जपत असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे मत व्यक्त करीत माणगाव तालुक्यात सुमारे 25 हजार वारकरी आहेत. अनेक धार्मिक कार्यक्रमासह सामाजिक उपक्रम वारकरी राबवित असतात. स्वच्छता मोहिम, तंटामुक्त अभियान, व्यसनमुक्ती असे अनेकविध उपक्रम प्रवचन व प्रबोधनातून वारकरी समाजापूढे मांडत असतात. मात्र हे करत असतांना मिळेल तिथे वेळप्रसंगी अपुर्‍या जागेत कार्यक्रम करावे लागतात. आपली हक्काची वास्तु वारकरी सांप्रदायाकडे नसल्याची वारकरी सांप्रदायाची खंत उपस्थित वारकर्‍यांनी पंकज तांबे यांच्याकडे व्यक्त केली. त्यांच्याजवळ सकारात्मक चर्चा करीत सर्व जाती धर्माबरोबरच समाजप्रबोधन, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमाबरोबरच त्यांची निवासाची सोय व्हावी यासाठी माणगाव येथे आपल्या खारीच्या वाट्यासह लोकवर्गणी व देणगीतून सुमारे 500 वारकरी बसतील एवढी मोठे सुमारे एक कोटी रूपयांचे वारकरी भवन आगामी काळात उभारण्याचा निर्धार पंकज तांबे यांनी केला. पंकज तांबे यांनी घेतलेल्या निर्णयाचे उपस्थित वारकर्‍यांनी स्वागत करून त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
दरम्यान, पंकज तांबे याच्या निर्धाराला बैठकीनंतर दिवसभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने आगामी काळात माणगावात भव्य वारकरीभवनची वास्तू उभी राहील, अशी वारकर्‍यांची खात्री झाली आहे.

कमिटीची स्थापना

निर्धार झाल्यानंतर पंकज तांबे यांनी नियोजनबध्द कामाची आखणी करीत माणगाव तालुका वारकरी भवन समिती स्थापन केली. या समितीमध्ये तालुका अध्यक्ष म्हणून ह.भ.प. बाळाराम मुरकर महाराज, उपाध्यक्ष प्रकाश वाढवळ, सुरेश टेंबे, सचिव पदी सुंदर निमन, सहसचिव राम गुगले, संतोष मोरे, खजिनदारपदी जयराम खाडे, जगन्नाथ पुरी, सल्लागारपदी मुकूंद वाढवळ, सिताराम ढेपे, नथुराम उभारे यांची कार्यकारिणी सर्वांनुमते निवडण्यात आली.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

बेपत्ता कामगार सापडला मातीच्या ढिगार्‍याखाली!

Related posts
Your comment?
Leave a Reply