82 Viewed Raigad Times Team 0 respond

श्री काळभैरव क्रीडामंडळ मुरुड आयोजित कबड्डी स्पर्धा

। रायगड टाइम्स ।
मुरुड । श्री काळभैरव क्रीडामंडळ, मुरुड आयोजित कबड्डी स्पर्धेत सिद्धीविनायक संघ नांदगाव व जय हनुमान संघ चरी यांच्यात अंतिम लढत होवून अखेर सिद्धीविनायक संघ सात गुणांनी अंतिम विजेता ठरला. जय हनुमान संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
यंदा 49 वर्षातील या कबड्डी स्पर्धेत 24 नामवंत संघांनी भाग घेतला होता. याचे उद्घाटन नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्याहस्ते, उपनगराध्यक्षा नौसिन दरागे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सिद्धीविनायक संघाचे मिथून भोईर, पराग पाटील, रोजित माळी, ओंकार गाणार, ओंकार पाटील, चेतन माळी या खेळाडूंनी अप्रतिम चढाया व पक्कडी करुन आपल्या संघास विजय संपादन करुन दिला. जय हनुमान संघाचे कमलाकांत जाधव, संजय थळे, हर्शद पाटील, दर्शन थळे, अमोल पाटील, जयेश थळे या खेळाडूंनी आपला उत्तम चौफेर खेळ केला.
प्रथम क्रमांक सिद्धीविनायक संघ नांदगांव यांस मंडळाकडून रोख रु.21 हजार व चषक, द्वितीय क्रमांक श्री हनुमान संघ चरी यांस रु. 15 हजार व चषक, तृतीय क्रमांक काळंबादेवी संघ गडब यांस रु.7 हजार 500 व चषक, चतुर्थ क्रमांक सोनार सिद्ध संघ धाटाव यांस रु.7 हजार 500 व चषक तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पराग पाटील नांदगांव, सर्वोत्कृष्ट पकड म्हणून रोजित माळी नांदगांव व सर्वोत्कृष्ट चढाईसाठी सुजल थळे चरी अशी बक्षिसे मंडळाकडून देण्यांत आली.
बक्षिस वितरण समारंभ नगरसेवक प्रमोद भायदेंच्या हस्ते व नगरसेवक अविनाश दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नगरसेवक विजय पाटील, प्रभाकर तोडणकर, मोहन पाटील, सुरेश कासेकर, पांडुरंग आरेकर, विजय भोय, मदन हणमंते, सुरेश पाटील यांच्या हस्ते पार पडला.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

माणगावात होणार 1 कोटींचे वारकरी भवन

मंगळवाडी रोहा नगरपालिका शाळा क्र.9 झाली डिजिटल

Related posts
Your comment?
Leave a Reply