सर्वे- सर्वेश्वर मंदिरात शिवरात्रौत्सव साजरा

75 Viewed Raigad Times Team 0 respond

। रायगड टाइम्स ।
कोर्लई । पांडवकालीन प्रसिद्ध असलेल्या निसर्गरम्य वातावरणात समुद्र किनारी वसलेल्या मुरुड तालुक्यातील सर्वे-सर्वेश्वर मंदिरात शिवरात्रौत्सव विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यादिवशी सकाळी 6 वाजता श्रीशिव-पिंडीवर विधीवत पुजा-अर्चा करण्यात आली. यानिमित्ताने दिवसभर श्रीशिव लिलामृत पारायण तसेच सुश्राव्य भजनाचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. तालुक्यातील भाविकांनी याचा लाभ घेतला. सकाळपासून शिव दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वे ग्रामस्थ व महिला मंडळाने विशेष परिश्रम घेतले.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

रायगडात महाशिवरात्री उत्साहात साजरी

महाशिवरात्रीनिमित्त नागोठणेत विविध धार्मिक कार्यक्रम

Related posts
Your comment?
Leave a Reply