बोर्लीपंचतन येथे भंडारी समाज सभामंडपाचे उद्घाटन

151 Viewed Raigad Times Team 0 respond

समाजाचे ऋण कधीही न फेडता येणारे-राजिप सदस्या सायली तोंडलेकर

। रायगड टाइम्स ।
बोर्लीपंचतन । माझ्यासारख्या गृहिणीला आपल्या सर्वांच्या आशिर्वादानेच परिसरातील जनतेची समाजसेवा करण्याची संधी मिळाली असून समाजाचे कोणतेही काम केल्याने ते ऋण फेडता येणार नाहीत, असे जिल्हा परिषद सदस्या सायली तोंडलेकर यांनी तर जनतेची सेवा करण्याची संधी मिळणे हे भाग्य असल्याचे प्रतिपादन माजी सभापती स्वाती पाटील यांनी केले.
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन भंडारी समाज संघटनेचे 10 लाख रूपयांच्या निधीतून बांधण्यात आलेले पहिल्या मजल्यावरील महिला समाजगृहाचे उद्घाटन स्वाती पाटील व राजिप सदस्या सायली तोंडलेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य शामकांत भोकरे, शिवसेना उपतालुकाप्रमुख सुकुमार तोंडलेकर, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते सुजित पाटील, उपसरपंच मंदार तोडणकर, भंडारी समाजाध्यक्ष शशिकांत परकर, उपाध्यक्ष अरूण तोंडलेकर, सचिव प्रसाद मुरकर, सहसचिव योगेश तोंडलेकर, खजिनदार नंदु पाटील, महिला अध्यक्षा सिमंतिका तोडणकर सर्व महिला मंडळ पदाधिकारी, खोतीप्रमुख रमाकांत तोंडलेकर, लिलाधर खोत, शरद भाटकर, सौगंध तोडणकर उपस्थित होते.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

बोगस आदिवासींविरोधात लढा उभारा

पुई येथे शिवजयंती महोत्सवाचे आयोजन

Related posts
Your comment?
Leave a Reply