शिवरायांच्या विचारांचे सर्वांनी अनुकरण करावे-माणिक टेंगळे

93 Viewed Raigad Times Team 0 respond

। रायगड टाइम्स ।
दांडगुरी । जगातील लोकशाहीचे आद्य संस्थापक शिवाजी महाराज आहेत. समता, बंधुत्व यांची शिकवण महाराजांनी जगास दिली. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचाराचे अनुकरण करुया, असे आवाहन स्थानकप्रमुख यांनी माणिक टेंगळे शिवजयंतीप्रसंगी कामगारवर्गास संबोधीत करताना केले.
छत्रपती शिवाजी महाराजांची 388 वी जयंती श्रीवर्धन एसटी आगारात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात टेंगळे यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित विविध घटनांचा संदर्भ देत इतिहासातील काळाचे मार्मिक विवेचन केले. जगाला लोकशाही निर्मितीचा आदर्श राज्यांनी घालून दिला. जनता शिवरायांना देवासमान मानत. शिवराय जनतेस अपत्यतुल्य प्रेम देत होते.सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन शिवाजी महाजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. रयतेचे राज्य स्थापन केले. स्वाभिमान गमावलेल्या लोकांना आपल्या आत्मसन्मानाची ओळख करून दिली. अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून लोकशाहीची बीजे भारताच्या मातीत रुजवली व नवीन सशक्त स्वाभिमानी समाज निर्माण केला असे माणिक टेंगळे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात म्हंटले.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

पनवेलमध्ये दोन कंपन्यांना लागली आग

आदिवासी वाड्यांवर कपडे, खाऊचे वाटप

Related posts
Your comment?
Leave a Reply