माणगांवात शुक्रवारपासून ग्रामीण प्रिमिअर क्रिकेट लीगचा थरार

69 Viewed Raigad Times Team 0 respond

दि.23, 24 व 25 फेब्रुवारी आयोजन

। रायगड टाइम्स ।
माणगांव । माणगांव ग्रामीण टेनिस क्रिकेट असोशिएशनने प्रथमच माणगांवात अल्ताफदादा धनसे मैदान, मोर्बा रोड, निळगुण फाटा माणगांव या ठिकाणी 23, 24, व 25 फेबु्रवारी रोजी तालुक्यातील 48 गांव अंतर्गत माणगांव ग्रामीण प्रिमिअर क्रिकेट लीग स्पर्धा अयोजित केली आहे. या स्पर्धेचा महासंग्राम क्रिकेटप्रेमींना शुक्रवारपासून पहायला मिळणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी 9 वा. राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षाचे अनिकेत तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. लाखो रुपयांच्या बक्षिसांची ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या उद्घाटन समारंभास माणगांव नगराध्यक्ष आनंद यादव, रायगड जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अल्ताफ धनसे, युवक सचिव दिपक जाधव, दक्षिण रायगड मनसे अध्यक्ष देवेंद्र गायकवाड, निजामपूर विभाग अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर, मनसे माणगांव तालुका उपाध्यक्ष सुबोध जाधव, मराठी उद्योजक सुभाष दळवी, उद्योजक विनोद मेहता, मनसे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप सांगले, एकता असोसिएशन अध्यक्ष राहुल दसवते, छत्रपती असोसिएशन अध्यक्ष शैलेश शिंदे आदि मान्यवर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तरी या क्रिकेट स्पर्धेचा लाभ क्रिकेटप्रेमींनी आवश्यक घ्यावा, असे अवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

मुंबई विभाग स्तर कराटे स्पर्धा

रिलायन्सच्या मैदानावर महाराष्ट्र महिला संघाचे प्रशिक्षण शिबीर

Related posts
Your comment?
Leave a Reply