एकदरा गावातील ग्रामस्थांचा मूक मोर्चा

115 Viewed Raigad Times Team 0 respond

मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी

। रायगड टाइम्स ।
मुरुड-जंजिरा । एकदरा गावात दोन गट अस्तित्वात असून या गटात वारंवार भांडणे होत असतात. यातील एक गट हा मोतीराम पाटील यांचा समर्थक आहे. तर दुसर्‍या गटाने बहिष्कृत प्रकरण उच्च न्यालयापर्यंत नेले होते. समाजामध्ये वारंवार तेढ निर्माण करुन गावाला पोलीस ठाण्यात खेचणार्‍या विघ्नसंतोषी लोकांवर दहा दिवसांच्या आत कारवाई व्हावी, या मुख्य मागणीसह आपल्या अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकदरा कोळी समाज अध्यक्ष चंद्रकांत चांगू पाटील यांच्या नेतृत्वाखाली समस्त कोळी समाज महिला व पुरुषांनी तोंडाला काळी पट्टी बांधून मंगळवारी (दि.20) रस्त्यावर उतरले होते.
तहसील कार्यालयाजवळ हा मोर्चा येताच दरबार हॉल येथे सर्व जमा होऊन यांच्यातील प्रमुख अध्यक्ष चंद्रकांत पाटील, चिंतामणी लोदी, हरिश्‍चंद्र पाटील, जगनाथ वाघरे, रमेश गमबास, महिला मंडळ अध्यक्षा करुणा पाटील, देवकी पाटील, माधुरी वाघरे, निकिता पाटील, पूनम तांडेल या सर्वांनी नायब तहसिलदार रविंद्र सानप यांना निवेदन दिले. यावेळी सानप यांनी आपले निवेदन जिल्हाधिकारी यांना पोहचवले जाईल, असे अश्वासीत केले.
या निवेदनात असे म्हटले आहे की, एलईडी मासेमारीमुळे पारंपरिक मच्छिमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. कोळी समाजावर उपासमारीची पाळी आहे. शासनाने तात्काळ अशा मासेमारीवर बंदी आणावी अशी मागणी करण्यात आली आहे. एकदरा गावात ग्रामसभेचा ठराव नसतानासुद्धा सचिन आगरकर यांना बेकायदेशीर नळ कनेक्शन देण्यात आले. ग्रामसेवकांनी याच व्यक्तीला बेकायदा असेसमेंट दिल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच आगरकर यांनी बांधलेल्या घरांबाबत जागेचा वाद असल्यामुळे सुरु असलेले घराचे बांधकाम पूर्णतः बंद करण्यात यावे याबतचा सविस्तर अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुरुड पोलीस ठाणे राजकीय दबावाला बळी पडून आमच्या लोकांवर एकतर्फी केसेस दाखल करून आम्हाला निष्कारण त्रास दिला जात आहे. सदरच्या केसेस रद्द करण्यात याव्यात असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या सर्व मागण्यांसाठी हा मूक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी कोळी समाज अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्व समाजबांधवांचे विशेष आभार व्यक्त केले.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

अप्रशिक्षित शिक्षक निवृत्ती वेतनापासून वंचित

परळीचे माजी उपसरपंच अमोल देसाई यांची शिवसेनेतून हकालपट्टी

Related posts
Your comment?
Leave a Reply