एकाच दिवशी भाजपाने गमावले 2 आमदार

47 Viewed Raigad Times Team 0 respond

नवी दिल्ली । भारतीय जनता पक्षासाठी वाईट बातमी आहे. पक्षाने एकाच दिवशी आपले दोन आमदारांना गमावले. राजस्थानच्या नाथद्वारा मतदारसंघाचे आमदार कल्याणसिंह यांचे दीर्घ आजाराने निधन झाले तर दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या बिजनौरमधील नूरपूरचे आमदार लोकेंद्र सिंह यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. 41 वर्षीय लोकेंद्र यांची कार सीतापूर येथे एका ट्रकला धडकली. अपघात इतका भीषण होता की त्यात लोकेंद्र सिंह यांच्याबरोबर त्यांचे दोन सुरक्षारक्षक आणि ट्रक चालकाचाही जीव गेला. राजस्थानमधील आमदार कल्याणसिंह प्रदीर्घ काळापासून आजारी होते. त्यांच्यावर उदयपूर येथील एका रूग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी (दि.21) त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

प्रिया वारियरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

अजब! सातवीच्या मुलाची शिक्षिकेसह तिच्या मुलीला बलात्काराची धमकी

Related posts
Your comment?
Leave a Reply