अजब! सातवीच्या मुलाची शिक्षिकेसह तिच्या मुलीला बलात्काराची धमकी

85 Viewed Raigad Times Team 0 respond

गुरुग्राम । अवघ्या सातवीत शिकणार्‍या गुरुग्राममधल्या प्रतिष्ठित शाळेतल्या विद्यार्थ्याने शिक्षिका व तिच्या मुलीला बलात्कार करण्याची धमकी ऑनलाईन पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. शिक्षिकेची मुलगी त्याच्याच वर्गात शिकते. तर दुसर्‍या एका प्रकरणात याच शाळेतल्या आठवीतल्या एका विद्यार्थ्याने एका शिक्षिकेला कँडल लाईट डिनर व सेक्ससाठी आमंत्रण दिले आहे. गेल्या आठवड्यात हे दोन्ही प्रकार घडले आहेत. बलात्काराची धमकी मिळालेली शिक्षिका तर शाळेत आली, परंतु तिच्या मुलीने मात्र अद्याप धसका घेतलेला आहे व ती शाळेत येत नसल्याचे समजते.
या प्रकरणी सखोल तपास करण्यात येत असल्याचे शाळेने स्पष्ट केले आहे. अत्यंत आक्षेपार्ह अशा या घटना असून सायबर माध्यमाचा वापर करण्यात येत असल्याचे व शाळा अशा प्रकरणांना पाठिशी घालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी या लहान मुलांना मानसशास्त्रीय उपचारांची गरज असल्यास तेही करण्यात येणार आहे. दरम्यान, चाईल्ड वेल्फेअर कमिटीच्या अध्यक्षा शकुंतला धुल यांनी पुढाकार घेत याप्रकरणी लक्ष घातले आहे.
शाळेला व संबंधीत विद्यार्थ्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे आणि हा सगळा प्रकार काय आहे हे समजून घेण्यात येणार आहे असे त्या म्हणाल्या. शिक्षक तसेच मुलांसाठी मानसशास्त्रीय सल्ला देणारे वर्गही आयोजित करण्यात येतील असे त्या म्हणाल्या.
अर्थात, हा काही अपवादात्मक प्रसंग नसून अन्य शाळांमध्येही असे प्रकार वाढत असल्याचे काही प्रिन्सिपल्सनी सांगितले. हा एकूण सामाजासाठीच गांभीर्याचाच प्रश्न आहे आणि केवळ शाळा नाही तर एकूण समाजानंच या प्रश्नाचा वितार करायला हवा असे मत काही शिक्षकांनी व्यक्त केले आहे. मुले इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं, इंटरनेट व टिव्हीवर नको नको ते बघतात आणि सारासार विचार न करता अशी विघातक विचारसरणी आत्मसात करतात अशी खंत एका शिक्षणतज्ज्ञाने व्यक्त केली आहे. मुले कुठल्या वेबसाइट्स बघतात याचा पालकांना पत्ताच नसतो असेही आढळून आले आहे.
मुलांना घरी चांगली वागणूक मिळत नसेल, ते एकलकोंडे असतील व त्यांच्याशी कुणी संवाद साधत नसेल तर असे प्रकार घडू शकतात असे मत एका तज्ज्ञांने व्यक्त केले आहे. त्यामुळे मुलांच्या निकोप वाढीसाठी पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सातवीच्या मुलांनी बलात्काराची धमकी देणे वा टीचकला सेक्ससाठी आमंत्रण देणे हे मुलांचे संगोपन नीट झाले नसल्याचे लक्षण असल्याचे एका तज्ज्ञाने सांगितले.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

एकाच दिवशी भाजपाने गमावले 2 आमदार

गायीच्या पोटात 80 किलो पॉलिथीन

Related posts
Your comment?
Leave a Reply