गायीच्या पोटात 80 किलो पॉलिथीन

57 Viewed Raigad Times Team 0 respond

जनावरांच्या कचर्‍यातून प्लॅस्टीक खाण्याचा प्रश्न ऐरणीवर

पाटणा । वाढते प्रदूषण आणि शहरीकरण यांमुळे मानवाबरोबरच प्राण्यांच्या जीवालाही धोका असल्याचे आपण अनेकदा पाहतो. याचेच आणखी एक धक्कादायक उदाहरण नुकतेच समोर आले आहे. बिहारमधील एका गायीच्या पोटातून 80 किलो पॉलिथीन शस्त्रक्रिया करुन काढण्यात आले आहे. हा आकडा ऐकून खरा वाटत नसला तरी ते खरे आहे. सातत्याने पॉलिथीन खाण्यात आल्याने त्याचा गोळा या गायीच्या पोटात जमा झाला होता. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिची रितसर शस्त्रक्रिया करुन तो बाहेर काढण्यात आला.
पटनामधील पशुवैद्यकीय रुग्णालयात साधारण तीन तासांपेक्षा जास्त वेळ या गायीवर शस्त्रक्रिया सुरु होती. या घटनेमुळे डॉक्टरही आश्चर्यचकित झाले होते. या घटनेमुळे जनावरांच्या कचर्‍यातून प्लॅस्टीक खाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या गंभीर घटनेमुळे गाय आणि इतर पाळीव प्राण्यांच्या आरोग्याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गायीवर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर म्हणाले, ही गाय 6 वर्षांची आहे. माझ्या 13 वर्षांच्या अनुभवात मी पहिल्यांदाच अशी शस्त्रक्रिया केली. 3 तास सुरु असलेल्या या शस्त्रक्रियेत गायीच्या पोटात 4 ठिकाणी पॉलिथीन अडकले होते.
या गायीचे मालक दिपक कुमार म्हणाले, गायीला चरण्यासाठी बाहेर सोडण्यात यायचे. पण मागच्या काही दिवसांपासून ती नीट खात नव्हती. त्यामुळे तिला तपासणीसाठी रुग्णालयात नेले. त्यावेळी डॉक्टरांनी केलेल्या तपासणीमध्ये तिच्या पोटात बाहेरचे काही घटक असल्याची त्यांना शक्यता आली. त्यानुसार पुढील चाचण्या केल्यावर तिच्या पोटात पॉलिथीन असल्याचे लक्षात आले आणि शस्त्रक्रिया करायचे ठरले. दीपक कुमार दक्षिण पटनामध्ये गोशाळा आहे. असे प्रकार वारंवार घडून मुक्या जीवांच्या आरोग्याला धोका पोहचू नये यासाठी लोकांनीही खाण्याचे पदार्थ पॉलिथीनमध्ये भरून रस्त्यावर फेकण्याच्या सवयींना आळा घालायला हवा, असे मत शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टरांनी व्यक्त केले.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

अजब! सातवीच्या मुलाची शिक्षिकेसह तिच्या मुलीला बलात्काराची धमकी

मुंबईत लोकलमध्ये ज्येष्ठ पत्रकारावर जीवघेणा हल्ला

Related posts
Your comment?
Leave a Reply