मुंबईत लोकलमध्ये ज्येष्ठ पत्रकारावर जीवघेणा हल्ला

54 Viewed Raigad Times Team 0 respond

मुंबई । मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार सुधीर शुक्ला यांच्यावर 15 ते 20 जणांनी जीवघेणा हल्ला केल्याचे वृत्त आहे. ते इंडिया टीव्हीमध्ये कार्यरत आहेत. मीरारोड ते अंधेरी असा लोकल प्रवास करताना 15 ते 20 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि गंभीर जखमी केल्याची माहिती आहे.
विले-पार्ले येथील कुपर रूग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले आहे. लोकलमध्ये टोळक्याने चढणार्‍या प्रवाशांचा त्यांनी विरोध केला होता असे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मीरारोड ते अंधेरी असा लोकल प्रवास करताना लोकलमध्ये टोळक्याने चढणार्‍या प्रवाशांनी शुक्ला यांना चढण्यास विरोध केला होता. पण अखेर प्रयत्न करून शुक्ला गाडीत चढले, आणि नंतर त्या टोळक्यासोबत त्यांची बाचाबाची झाली. त्यानंतर टोळक्याने शुक्ला यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.
अंधेरीच्या जीआरपी पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई क्राइम रिपोर्टर्स असोसिएशने या घटनेची निषेध नोंदवला असून कठोर कारवाई कऱण्याची मागणी केली आहे.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

गायीच्या पोटात 80 किलो पॉलिथीन

डीएसकेंच्या राहत्या बंगल्याचा होणार ललाव

Related posts
Your comment?
Leave a Reply