डीएसकेंच्या राहत्या बंगल्याचा होणार ललाव

60 Viewed Raigad Times Team 0 respond

पुणे । गुंतवणूकदारांचे पैसे थकवल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. घेतलेले कर्ज परत न केल्यामुळे डीएसकेंच्या पुण्यातील राहत्या बंगल्याचा सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून लिलाव करण्यात येणार आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून डीएसकेंच्या पुण्यातील सेनापती बापट मार्गावरील राहत्या बंगल्याचा 8 मार्चला लिलाव होणार आहे. या बंगल्याची बेस प्राईस 66 कोटी 39 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. बँकेकडून या लिलावाची पेपरला जाहिरात देण्यात आली आहे.
पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील चतुःश्रृंगी टेकडी लगत हा आलिशान बंगला आहे. टेकडीवरील नैसर्गिक धबधबा डीएसकेंच्या या बंगल्यामध्ये येतो.
गुंतवणूकदारांचे 230 कोटी रुपये थकवल्याप्रकरणी डीएसकेंवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर त्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडीत येताच ते पाय घसरुन पडल्याने त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

मुंबईत लोकलमध्ये ज्येष्ठ पत्रकारावर जीवघेणा हल्ला

महापौरांच्या कार्यालयात आरटीई मदत केंद्र

Related posts
Your comment?
Leave a Reply