खांदा वसाहतीत जेष्ठांकरीता विरंगुळा केंद्र

127 Viewed Raigad Times Team 0 respond

महापौरांच्या हस्ते झाले लोकार्पण; ज्येष्ठांना मिळाली हक्काची जागा

। रायगड टाइम्स ।
पनवेल । खांदा वसाहतीत सेक्टर-6 येथील राजमाता आहिल्याबाई होळकर उद्यानात सिडकोकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात आले आहे. 19 फेब्रुवारी रोजी महापौर डॉ.कविता चौतमोल यांच्या हस्ते हे केंद्र लोकार्पण करण्यात आले. ज्येष्ठांना आता हक्काची जागा मिळाली आहे. या ठिकाणी त्यांना समवयस्कांबरोबर वेळ घालवता येणार आहे.
खांदा वसाहतीत तीन उद्यन आहेत. त्या ठिकाणी रहिवासी सायंकाळच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी जातात. अष्टविनायक रूग्णालयाच्या बाजूला मध्यवर्ती ठिकाणी उद्यान आहे. त्या ठिकाणी जेष्ठ नागरिक सकाळी आणि सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी येतात. काही काळ ते या ठिकाणी बसून गप्पा गोष्टी करतात, एकमेकांच्या सुख दुःखात समरस होतात. मात्र या उद्यानात बसत असताना ऊन, वारा, थंडी आणि पाऊसापासून सरंक्षण व्हावा यासाठी निवारा नव्हता. स्थानिक नगरसेवक संजय भोपी यांच्यासह इतरांनी सिडकोकडे यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार येथे विरंगुळा केंद्र बांधण्यात आले आहे. ते चालविण्याकरिता सोडत पध्दतीने अमोल ज्येष्ठ नागरिक संघाला देण्यात आले आहे. या ठिकाणी ज्येष्ठांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहाची सोय करून देण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभाग आणि महावितरणकडून नळ आणि पाणी जोडणी करून देण्यात आली. या व्यतिरिक्त ज्येष्ठांना मनोरंजन म्हणून टेलिव्हिजनची व्यवस्थाही करणार असल्याचे भोपी यांनी सांगितले.
हे केंद्र ज्येष्ठांसाठी उपयोगी ठरेल. त्याचबरोबर या ठिकाणी त्यांना विविध उपक्रमसुध्दा राबविता येतील, असा विश्वास महापौर डॉ.कविता चौतमोल यांनी व्यक्त केला. यावेळी नगरसेवक संजय भोपी, श्रीरंग वळकुंडे यांच्यासह पदाधिकारी, ज्येष्ठ उपस्थित होते.

Don't miss the stories follow Raigad Times and let's be smart!
Loading...
0/5 - 0
You need login to vote.

उशीरा येणार्‍यांचे फुल देऊन स्वागत

एलईडी मासेमारीमुळे जेलीफिश किनार्‍यावर?

Related posts
Your comment?
Leave a Reply